Virar Covid hospital Fire: दुर्घटनेसंदर्भातील चौकशी समितीच्या सूचना अमलात आणल्या जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:17 AM2021-04-24T05:17:00+5:302021-04-24T05:17:17+5:30

Virar Covid hospital Fire: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

The instructions of the inquiry committee regarding the accident will be implemented | Virar Covid hospital Fire: दुर्घटनेसंदर्भातील चौकशी समितीच्या सूचना अमलात आणल्या जाणार 

Virar Covid hospital Fire: दुर्घटनेसंदर्भातील चौकशी समितीच्या सूचना अमलात आणल्या जाणार 

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भातील चौकशी समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमली असून त्या चौकशी समितीने केलेल्या शिफारशी अमलात आणल्या जाणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीची पाहणी शुक्रवारी संध्याकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. त्या वेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी महसूलमंत्री थोरात बोलत होते.जिल्हा प्रशासन सतर्क असून पूर्ण क्षमतेने काम करत आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोनाशी दिवस-रात्र लढत आहे. प्रशासनावर या काळात प्रचंड ताण असला तरी भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी प्रशासन नियोजनबद्ध काम करेल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

अशी आहे चौकशी समिती
विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ अध्यक्ष असलेल्या या समितीत महापालिका आयुक्त गंगाथरन डी., जिल्हा वैद्यकीय अधिकारी दयानंद सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त संजय पाटील आणि वसई-विरार महापालिका अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांचा समावेश आहे. समितीने १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करायचा आहे.

पंतप्रधानांकडून तीव्र दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अग्नितांडव घटनेची माहिती घेऊन तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना दोन लाख व जखमींसाठी ५० हजार रुपयांची मदत ट्विटरवरून जाहीर केली.

गृहमंत्र्यांकडून शोक व्यक्त
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची आणि त्यात १५ जणांच्या झालेल्या मृत्यू बाबतीत तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

जखमींची योग्य काळजी प्रशासन घेतेय - पालकमंत्री 

वसई : विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा घटना भविष्यात यापुढे घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत, तसेच या घटनेतील जखमींची जिल्हा प्रशासन योग्य काळजी घेत आहे, असे कृषी, माजी सैनिक कल्‍याणमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विरार येथे घटनास्थळी भेटी वेळी ‘लोकमत’ला सांगितले.


वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील विजय वल्लभ हॉस्पिटल, तिरुपती फेज-१, विरार (प.) या ४ मजली रुग्णालयामध्ये रात्री ३:१३च्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागून १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पालकमंत्री भुसे घटनास्थळी दाखल झाले.
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. सदर रुग्णालयात एकूण ९० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. इतर रुग्णांना
दुसऱ्या रुग्णालयांमध्ये तत्काळ हलविण्यात आले असून, प्रशासन त्यांची काळजी घेत आहे, असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

Web Title: The instructions of the inquiry committee regarding the accident will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.