Jaipur-Mumbai Train Firing: 31 जुरै रोजी जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग याच्याबाबत नवा खुलासा झाला आहे.
आपल्या वरिष्टासह चार जणांची गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चेतन सिंग मानसिक आजारी असल्याचा दावा केला जात होता. पण, आता यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. आरोपीच्या वैद्यकीय तपासणीत तो मानसिक आजार आढळला नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. म्हणजेच, त्याने गोळीबार केला, तेव्हा तो एकदम व्यवस्थित होता.
चेतन सिंग कसा पकडला गेला?जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (31 जुलै) सकाळी 6 च्या सुमारास चेतन सिंग याने आपल्या वरिष्ठ सहकारी आणि तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. ही घटना मीरा रोड स्थानकाजवळ घडली. या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्न असलेल्या आरोपी चेतन सिंगला पकडण्यात आले. या घटनेत आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यासह B5 कोचमधील एका प्रवाशाला गोळ्या घातल्या.
यानंतर पाच वाजून 10 मिनिटांनी पॅन्ट्री कारमधील एका व्यक्तीसह S6 बोगीतील आणखी एका प्रवाशाला गोळ्या घातल्या. मृतांमध्ये अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (58, रा. नालासोपोरा) आणि असगर अब्बास शेख (48, रा. बिहारमधील मधुबनी) आणि सय्यद एस. (43) अशी मृतांची नावे आहेत.