फिरसे ओ मुस्कुरायेगा... 35 दिवसांच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, उपचारानंतर ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:21 PM2020-05-15T15:21:52+5:302020-05-15T15:22:26+5:30

कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकजण बरे होवून आपल्या घरी गेले आहेत.

kalyan dombivali municipal corporation 51 patient recover one day-SRJ | फिरसे ओ मुस्कुरायेगा... 35 दिवसांच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, उपचारानंतर ठणठणीत

फिरसे ओ मुस्कुरायेगा... 35 दिवसांच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, उपचारानंतर ठणठणीत

Next

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहे.  कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पण अशातच कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकजण बरे होवून आपल्या घरी गेले आहेत.

सकारात्मक बाब म्हणजे एका दिवसांत 51 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले असून यांत 35 दिवसांच्या चिमुकला, 2 महिन्यांचं बाळ आणि 8 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. गुरुवारी संध्याकाळी सगळ्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण 391 रुग्णापैकी एकूण 181 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 

कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एकूण 391 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1019 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय शासन घेऊ शकते.

Web Title: kalyan dombivali municipal corporation 51 patient recover one day-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.