मुुंबई : मोलकरणीला घरात डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी व त्याची पत्नी अॅड्रिया यांच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दोन वर्षांपासून पगार दिला नसल्याची तक्रार मोलकरीण सोनी सरसाल हिने पोलिसांत दिली आहे.कांबळी दाम्पत्याने त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून, सोनी ही अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याने तिला कामावरून काढून टाकल्याचे सांगितले आहे. सोनी ही दोन वर्षांपासून कांबळीच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये घरकाम करीत असून, तेथेच राहत होती. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत तिने म्हटले आहे, की आठ दिवसांपूर्वी तिने अॅड्रिया हिच्याकडे थकीत पगाराची मागणी केली. मात्र तिने नकार देत पती दिल्लीहून परत येईपर्यत थांबण्यास सांगितले. विनोद कांबळी आल्यानंतर दोघांनी मला मारहाण केली. तीन दिवस एका खोलीत बंद करून ठेवले होते, पैशांची वारंवार मागणी करूनही पगार न देता घरातून हाकलून दिले.त्यांच्याकडून नेहमी अपमानास्पद वागणूक दिली जात होती. पगार मागितल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या विनोद कांबळींनी मला थप्पड मारली़ दोघांनी मला एका खोलीत कोंडले. माझा मोबाइलही काढून घेतला होता.- सोनी सरवाल, मोलकरीणसोनीने केलेले सर्व आरोप खोटे आहेत. ती कामचुकार होती, शिवाय घरात ड्रग्ज घेत असे. त्याचा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने तिला कामावरून काढून टाकले. - विनोद कांबळी, माजी कसोटीपटू
कांबळी दाम्पत्याने मोलकरणीला कोंडले
By admin | Published: August 31, 2015 1:49 AM