कोयना धरणातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:46 AM2017-07-31T02:46:59+5:302017-07-31T02:47:02+5:30

कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी सकाळी अकरा वाजता दोन फुटांनी उघडण्यात आले.

kaoyanaa-dharanaatauuna-paanai-saodalae | कोयना धरणातून पाणी सोडले

कोयना धरणातून पाणी सोडले

googlenewsNext

पाटण (जि.सातारा) : कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी सकाळी अकरा वाजता दोन फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे कोयना नदीपात्रात ९ हजार ६२६ तसेच पायथा वीजगृहातून २ हजार १६६ असा ११ हजार ७९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून सरासरी ३,२९० मिलीमीटर पाऊस झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाऊस २७ टक्क्याने जास्त आहे. सध्या धरणात ८३.२० टीएमसी साठा आहे.
जलाशय परिचलन सुचीनुसार १ आॅगस्टपर्यंत निर्धारीत पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी यंदा लवकर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी दिली़ विसर्ग सुरू झाल्याने कोयना नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: kaoyanaa-dharanaatauuna-paanai-saodalae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.