शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
3
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
4
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
5
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
6
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
7
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
8
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
9
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
10
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
11
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
12
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
13
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
14
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
15
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
16
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
17
दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?
18
Adani Group Stocks: 'या' सेगमेंटमध्ये अदानींच्या शेअर्सची एन्ट्री; ३ शेअर्सनं पकडला तुफान स्पीड, तुमच्याकडे आहे का?
19
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
20
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."

चिमुकल्या हातांची किमया : चिखलमय रस्ता झाला सुखमय

By admin | Published: July 27, 2016 8:38 PM

ते दररोज चिखल तुडवित शाळेत जात होते. कोणतीही कुरकूर नव्हती. कुणालाही दोष नव्हता. ना ग्रामपंचायतीकडे तक्रार, ना पुढाऱ्यांच्या नावे बोटे मोडणे

विठ्ठल कांबळे, घाटंजी ते दररोज चिखल तुडवित शाळेत जात होते. कोणतीही कुरकूर नव्हती. कुणालाही दोष नव्हता. ना ग्रामपंचायतीकडे तक्रार, ना पुढाऱ्यांच्या नावे बोटे मोडणे. त्यांनीच एक दिवस मनात आणले, चिखलात एक-एक दगड टाकला आणि काही दिवसात शाळेत जाण्यासाठी खडतर का होईना परंतु सुखकर रस्ता तयार झाला. ही किमया घाटंजी तालुक्यातील शिवणी पोडावरील पहिली ते पाचवीच्या २९ विद्यार्थ्यांनी केली. आज या रस्त्यावरून ते चिमुकले हसतमुखाने शाळेत जात आहे.

घाटंजी तालुक्यातील शिवणी गावापासून एक किलोमीटर अंतरावर शिवणी पोड आहे. ५०० लोकवस्तीचे गाव आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत २९ विद्यार्थी शिक्षण घेतात. दोन शिक्षक आहे. परंतु या पोडाला जोडणारा पक्का रस्ता नाही. आहे तो रस्ता म्हणजे केवळ पायवाटच. एवढा अरुंद की, रस्त्याच्या दोनही बाजूला शेताचे काटेरी कुंपन आहे. पावसाळ्यात तर विचारता सोय नाही. रस्त्यावरून पाणी वाहत असते. चिखल असतो. याच रस्त्यावरून विद्यार्थी दररोज आपल्या शाळेत जातात. कुणाचे कपडे चिखलाने माखतात, तर कुणी पाय घसरुन पडतात. असेच हाल गावकऱ्यांचेही होत आहे.

या शाळेतील शिक्षक प्रदीप जाधव आणि पुंडलिक आत्राम या शिक्षकांनी या रस्त्याचा अनुभव घेतला. मात्र कुणाला दोष देण्यापेक्षा त्यांनी आपल्याच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. दुपारच्या सुटीत या दोन शिक्षकांनी आजूबाजूचे दगड आणून चिखलात टाकले. मुलांनाही हुरुप आला. त्यांनी शिक्षकांना साथ दिली. ह्यसाथी हाथ बढाना, साथी रेह्ण या प्रमाणे विद्यार्थी एकवटले, ताकद वाढली. पाहता पाहता चिखलात दगडांची रास पडली. चिखल खाली दबला गेला आणि विद्यार्थ्यांसाठी सुखकर रस्ता तयार झाला. छोटासा का होईना परंतु रस्ता झाला.

इतरांना दोष देणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात या चिमुकल्या हातांनी झणझणीत अंजन भरले. कुणी कुणाविरुद्ध तक्रार केली की ग्रामपंचायतीच्या मुरुमाची प्रतीक्षा केली नाही. केवळ आपल्या चिमुकल्या हातांनी ही किमया करून दाखविली.