मध्य रेल्वेकडून कुंभमेळा ‘स्पेशल’

By admin | Published: August 18, 2015 01:00 AM2015-08-18T01:00:13+5:302015-08-18T01:00:13+5:30

कुंभमेळानिमित्त नाशिकसाठी मध्य रेल्वेकडून ‘स्पेशल’ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. आता आणखी १२ जनसाधारण तसेच १२८ अनारक्षित फेऱ्यांची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे

Kumbh Mela 'Special' from Central Railway | मध्य रेल्वेकडून कुंभमेळा ‘स्पेशल’

मध्य रेल्वेकडून कुंभमेळा ‘स्पेशल’

Next

मुंबई : कुंभमेळानिमित्त नाशिकसाठी मध्य रेल्वेकडून ‘स्पेशल’ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. आता आणखी १२ जनसाधारण तसेच १२८ अनारक्षित फेऱ्यांची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. यात नाशिक ते नांदेड, औरंगाबाद, अमरावती, दौंड, इटारसी, देवळाली-वर्धा फेऱ्यांचा समावेश आहे.
नाशिक रोड ते नांदेडदरम्यान १२ जनसाधारण विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. ट्रेन नंबर 0७९२६ नांदेड येथून आॅगस्ट महिन्यात १८, २५, २८ तारखांना, तर सप्टेंबर महिन्यात १२, १७, २४ तारखांना २२.00 वाजता सुटेल आणि नाशिक रोड येथे दुसऱ्या दिवशी १0.५0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0७९२७ नाशिक रोड येथून आॅगस्ट महिन्याच्या १९, २६, २९ तारखांना तसेच सप्टेंबर महिन्याच्या १३, १८, २५ तारखांना सुटेल आणि नांदेड येथे दुसऱ्या दिवशी १0.0५ वाजता पोहोचेल.
ट्रेन नंबर 0१२५१/0१२५२ देवळाली-वर्धा-देवळालीच्या १६ फेऱ्या होणार आहेत. 0१२५१ ट्रेन देवळाली येथून ३१ आॅगस्ट त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या १४, १५, १९, २0, २६ आणि २७ तारखेला सोडण्यात येईल. तर 0१२५२ ट्रेन
वर्धा येथून आॅगस्ट महिन्याच्या
२९, ३0 तर सप्टेंबरच्या १३, १४, १८, १९, २५, २६ तारखांना सोडण्यात येणार आहे.
नाशिक रोड-औरंगाबाद-नाशिक रोड ट्रेनच्या १६ फेऱ्या होणार आहेत. ट्रेन नंबर 0१२५३ नाशिक रोडहून आॅगस्टच्या ३0 आणि ३१ तसेच सप्टेंबर महिन्याच्या १४, १५, १९, २0, २६, २७ तारखांना सुटेल. तर औरंगाबाद येथून याच तारखांना सोडण्यात येईल. आणखी एक ट्रेन नंबर 0१२५५/0१२५६ नाशिक
रोड-औरंगाबाद-नाशिक रोड ट्रेन सोडण्यात येणार असून त्याच्या २४ फेऱ्या होतील. आॅगस्ट महिन्याच्या २९, ३0, ३१ आणि सप्टेंबर महिन्याच्या १, १३, १४, १५, १६, १८, १९, २0, २१, २५, २६, २७, २८ तारखांना सोडण्यात येणार आहेत.
ट्रेन नंबर 0१२६१/0१२६२ नाशिक रोड-इटारसी-नाशिक रोड ट्रेनच्या २४ फेऱ्या, ट्रेन नंबर 0१२६५/0१२६६ नाशिक रोड-इटारसी-नाशिक रोडच्या १६ फेऱ्या होणार आहेत. या दोन्ही ट्रेनच्या याच तारखांना फेऱ्या होतील. (प्रतिनिधी)

Web Title: Kumbh Mela 'Special' from Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.