लासलगावला कांदा ४७ रुपये किलो !
By admin | Published: August 18, 2015 01:12 AM2015-08-18T01:12:35+5:302015-08-18T01:12:35+5:30
अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये सोमवारी कांद्याच्या घाऊक दरात क्विंटलमागे तब्बल ७०९ रुपयांची वाढ होऊन कांदा
लासलगाव (नाशिक) : अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये सोमवारी कांद्याच्या घाऊक दरात क्विंटलमागे तब्बल ७०९ रुपयांची वाढ होऊन कांदा ४,७११ (४७ रु/किलो) रुपयांवर जाऊन पोहोचला. कांद्याच्या दरामधील हा हंगामातील विक्रम आहे.
यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. सध्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला उन्हाळी कांदा येत आहे. गुरुवारी येथे प्रतिक्विंटल ४,०१२ सर्वाधिक भाव मिळाला होता. त्यानंतर तीन दिवस बाजार समितीला सुटी होती. मंगळवारी ६,५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात किमान २,५०० तर सर्वाधिक ४,७११ रुपये भाव मिळाला, तर सरासरी दर ३,६११ रुपये राहिले. सप्टेंबरमध्ये बाजारात नवा कांदा आल्यानंतरच दर नियंत्रणात राहतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील सप्ताहात कांद्याचे दर ३,७०० ते ४,००० दरम्यान होते. मात्र अपेक्षित दर्जाअभावी चांगला भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. (वार्ताहर)