- श्रीकिशन काळेपुणे : पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक जैवविविधता असून, गेल्या ६० वर्षांमध्ये बेडूक, पाल, खेकडे, मासे आदींसह नवीन ८५ प्राण्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेने ही संशोधनाची मोलाची कामगिरी केली आहे.भारतीय प्राणी सर्वेक्षणाचे पुण्यात १९६० पासून विभागीय केंद्रआहे. त्या ठिकाणी अनेक वैज्ञानिक काम करत असून, त्यांनी या ८५ नव्या प्रजाती शोधल्या आहेत. प्राणी कुठला, यापूर्वी ती प्रजाती कुठे दिसली आहे का? अशी संपूर्ण माहिती संकलित करून आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ती प्रसिद्ध केली जाते. त्यानंतरच नव्या प्रजातीला नाव मिळते, अशी माहिती भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेचे पश्चिम प्रादेशिक केंद्राचेप्रमुख डॉ. पी. एस. भटनागर यांनी दिली.देशातून ५ हजारांहून अधिक नव्या प्रजातीभारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेने आतापर्यंत संपूर्ण देशातून ५ हजारांहून अधिक नव्या प्रजाती समोर आणल्या आहेत. १६ प्रादेशिक केंद्रांद्वारे या प्रजातींवर संशोधन झाले आहे.५३३ प्राण्यांचे अवशेष जतनपुण्यातील केंद्रातप्राण्यांचे संग्रहालय असून, त्यात पश्चिम घाटातील सुमारे ५३३ प्राण्यांचे अवशेष जतन करून ठेवले आहेत. ते नागरिकांना पाहण्यासाठी विनाशुल्क उपलब्ध आहेत. परंतु, सध्या लॉकडाऊनमुळे संग्रहालय बंद आहे.संग्रहालयात आफ्रिकन बिबट्या, हॉर्नबिल, विविध प्रकारचे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी आणि रायगड येथे आढळलेले सेंटीपीडी ही प्रजाती येथे पहायला मिळते. समुद्रात राहणारे सर्वात छोटे कासव ‘आॅलिव्ह रिडले टर्टल’ येथे जतन करून ठेवले आहे.
पश्चिम घाटात ६० वर्षांत ८५ नव्या प्रजातींना मिळाले नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 3:26 AM