Lata Mangeshkar Last Days: लतादीदी: हॉस्पिटलमध्ये ईयरफोन मागविले, वडिलांची गाणी ऐकली, अन् प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 07:12 PM2022-02-06T19:12:08+5:302022-02-06T19:13:13+5:30

Lata Mangeshkar Last two days: लता मंगेशकर दोन दिवसांपूर्वी शुद्धीत होत्या. व्हेंटिलेटरवर असताना त्यांनी ईअरफोन मागविले. त्यांना स्वत:ची गाणी ऐकणे आवडत नव्हते.

Lata Mangeshkar Last two Days: Lata Didi Ordered earphones in hospital, listened her father's dinanath Mangeshkar's songs before death | Lata Mangeshkar Last Days: लतादीदी: हॉस्पिटलमध्ये ईयरफोन मागविले, वडिलांची गाणी ऐकली, अन् प्राण सोडले

Lata Mangeshkar Last Days: लतादीदी: हॉस्पिटलमध्ये ईयरफोन मागविले, वडिलांची गाणी ऐकली, अन् प्राण सोडले

googlenewsNext

अवघ्या जगाला गोड गळ्याने वेड लावणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज अनंतात विलिन झाल्य़ा. मुंबईत आज जनसागर लोटला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खानसह अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती शिवाजीपार्कवर आले होते. लतादीदी कधीच आपली गाणी ऐकत नसत, अखेरच्या क्षणीदेखील त्यांनी वडिलांनी गायलेली नाट्यगीते ऐकली आणि या जगाचा निरोप घेतला. 

लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणारे हरीश भिमानी यांनी आज तकला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी लता दीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. अखेरच्या दोन दिवसांत लतादीदी काय करत होत्या याबद्दल हृदयनाथ यांनी त्यांना सांगितले. 

लता मंगेशकर दोन दिवसांपूर्वी शुद्धीत होत्या. व्हेंटिलेटरवर असताना त्यांनी ईअरफोन मागविले. त्यांना स्वत:ची गाणी ऐकणे आवडत नव्हते. त्यांनी या क्षणाला त्यांचे वडील पंडीत दीनानाथ मंगेशकर यांची नाट्यगीते ऐकली, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी भिमानी यांना सांगितले. 

उद्या राज्यभर दुखवटा, सार्वजनिक सुट्टी
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयं देखील बंद राहणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे

Web Title: Lata Mangeshkar Last two Days: Lata Didi Ordered earphones in hospital, listened her father's dinanath Mangeshkar's songs before death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.