Maratha Reservation: 'आरक्षण मिळाल्याचा आनंद, पण जल्लोष कशाला?' 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 11:05 AM2018-11-30T11:05:09+5:302018-11-30T11:18:27+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, याचा जल्लोष कशाला करता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला विधानसभेत केला.

Leaders of Opposition Radhakrishna Vikhe-Patil speech in vidhan sabha on reservation issue | Maratha Reservation: 'आरक्षण मिळाल्याचा आनंद, पण जल्लोष कशाला?' 

Maratha Reservation: 'आरक्षण मिळाल्याचा आनंद, पण जल्लोष कशाला?' 

googlenewsNext

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनच्या आजच्या शेवटच्या दिवशी कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, याचा जल्लोष कशाला करता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला विधानसभेत केला.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आहे.  त्यानंतर आज विधानसभेत धनगर, मुस्लीम आरक्षणावर चर्चा करण्यात करण्यात आली. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, सरकारकडून याबाबत जल्लोष का साजरा करण्यात येतो, असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. 

त्याचबरोबर, धनगर आरक्षणासाठी पुढच्या अधिवेशनाची वाट पाहायची का? असा सवाल करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी धनगर आरक्षणासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी केली आहे. तसेच, मुस्लीम आरक्षणासंदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुस्लीम समाजातील मागासवर्गींयांना आरक्षण देण्यास सरकार तयार असल्याचे स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी विधानसभेत दिले आहे.

दरम्यान, काल मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपा आमदारांनी फेटे बांधून आणि मिठाई वाटून  सभागृहाबाहेर जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला. त्यांनी म्हटल्याप्रमाणे 1 डिसेंबरला जल्लोष होणारच अशीही भावना भाजपाच्या आमदारांनी बोलून दाखवली होती.

Web Title: Leaders of Opposition Radhakrishna Vikhe-Patil speech in vidhan sabha on reservation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.