जाणून घ्या...पिलेल्या शहाळांचे पुढे काय होते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:57 PM2019-05-18T12:57:45+5:302019-05-18T13:02:13+5:30
पांढºया गरापासून बर्फी, लाडू, दूध तर करवंटीचा सरपणासाठी वापर
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : कल्पवृक्षाचे फळ म्हणून पाहिल्या जाणाºया शहाळाला सोलापूरकरांनी उन्हाळ्यात सर्वाधिक आरोग्यदायी म्हणून पसंती दिली़ आतील पाणी प्यायल्या, नंतर राहिलेल्या शहाळाचाही सोलापूरकर पुरेपूर वापर करताहेत़ आतील पांढºया गरापासून बर्फी, लाडू आणि कोकम दूध तर हिरव्या करवंटीचा सरपण म्हणून वापर करताहेत. अर्थात फळ एक, फायदे अनेक अशी व्याख्या आता रूढ होतेय.
श्रमकरी वर्गाच्या सोलापुरात शहाळाचा वापर बºयापैकी आहे़ आजारी रु ग्णांना शहाळ दिलं जातंय़ शाळा सुटल्यानंतर अनेक पालक मुलांना शहाळाचे पाणी पाजताहेत़ धार्मिक पूजेसाठीही पूर्व भागात ओला हिरवा नारळ वापरला जातोय़ काही संस्था, संघटना आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांना नारळाऐवजी शहाळ देऊन स्वागत करण्याची प्रथा रूढ झाली आहे़ त्यामुळे शहरात शहाळाचा वापर अनेक कारणांसाठी केला जातोय.
शहरात काही ठिकाणी या शहाळाचा वापर सरपणासाठी केला जातोय़ तो जळाऊ लाकडाप्रमाणेच कमी किमतीत काही जण विकतात तर काही विके्रते स्वत:साठीच सरपण म्हणून वापरताहेत़ परंतु शहाळाचा कचरा होणे पूर्णत: थांबले आहे़ आरोग्यदायी नारळ आता सोलापूरकरांसाठी बहुगुणी आणि बहुउपयोगी ठरला आहे.
झोपडपट्टीवासीयांसाठी सरपणच
- सध्या जळाऊ लाकूड कमी प्रमाणात उपलब्ध आहे़ अनेक ठिकाणच्या आरा गिरण्या संकटात आहेत, तर काही गिरण्या बंद आहेत़ झाडांची कमतरता असल्याने वाळलेल्या झाडांचीही संख्या राहिली नाही़ मिळणाºया जळाऊ लाकडाचे दरदेखील काही दिवसांपूर्वी वाढले आहेत़ यावर सर्वांत चांगला मार्ग म्हणून झोपडपट्टीतील काही लोक पाणी वापरून झालेले शहाळ फ ोडून ते उन्हात वाळायला घातले जाते आहे़ हेच सरपण म्हणून काही लोक विकताहेत़ काही विक्रेते सकाळी कचरा घेऊन जाणाºया घंटागाडीला टाकून दिलेले शहाळ पुरवताहेत़ मोदी, लष्कर, अशोक चौक अशा परिसरातील काही झोपडपट्ट्यांमध्ये सर्वसामान्य लोक हे शहाळ आणून सत्तूरने त्याचे तुकडे करून वाळायला घालताहेत़
कोको पिठाचे खत
- पाणी वापरून झालेल्या शहाळातून कधी-कधी पांढरे दूध निघते़ ते शरीराला आरोग्यदायी मानले जाते़ त्याच्या कात्यापासून दोरी बनवली जाते़ याशिवाय काही ठिकाणी शहाळ वाळवून ते फोडून त्यापासून कोको पीठ बनवले जाते़ हे पीठ अर्थात सर्वच पिकांसाठी खत म्हणून शेतात वापरले जाते़ याशिवाय पांढºया गरापासून बर्फी, लाडूही बनवले जातात तर काही कुटुंबे त्यामध्ये साखर घालून मुलांना खायला देताहेत़
१५ दिवसाला १६ ट्रक...
- अख्ख्या महाराष्ट्राला कोकणमधून शहाळ पुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपूर्वी कोकणात तुटवडा निर्माण झाल्याने बंगळुरूमधील मुद्दूर येथून नारळाची आवक झाली. आता मुद्दूर येथील शहाळाची आवक पूर्णत: थांबली आहे, मात्र याच बंगळुरूतील मंड्या येथून आवक सुरू आहे. आताही पूर्वीप्रमाणेच १५ दिवसाला १६ ट्रक शहाळांची आवक आहे. हादेखील तुटवडा मानला जातो. याचा दर मात्र ३५ रुपयांवर स्थिर आहे.