एसटीकडे चार वर्षांत १६ कोटी प्रवाशांची पाठ

By admin | Published: May 17, 2016 05:41 AM2016-05-17T05:41:02+5:302016-05-17T05:41:02+5:30

गेल्या चार वर्षांत १६ कोटी २७ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले

Less than 16 crore passengers in four years of ST | एसटीकडे चार वर्षांत १६ कोटी प्रवाशांची पाठ

एसटीकडे चार वर्षांत १६ कोटी प्रवाशांची पाठ

Next


मुंबई : प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न
केले जात असतानाच गेल्या चार वर्षांत १६ कोटी २७ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या कालावधीत ५१४ नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
मोडकळीस आलेल्या बसेस, बस आणि स्थानकांत असलेली अस्वच्छता यामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याचे एसटीचे अधिकारीच सांगतात. याचा परिणाम प्रवासी संख्या आणि उत्पन्नावर होत आहे. अवैध वाहतुकीचाही मोठा फटका महामंडळाला बसत आहे. अवैध वाहतुकीमुळे तब्बल ७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्नही बुडत आहे.
एसटीची प्रवासीसंख्या २0१२-१३मध्ये २६१ कोटी ३७ लाख होती. हीच संख्या २0१५-१६मध्ये २४५ कोटी १0 लाख झाली. जवळपास १६ कोटी २७ लाख प्रवासी कमी झाले आहेत. एसटी महामंडळाला हा सर्वांत मोठा फटका बसला असून, त्यामुळे उत्पन्नही कमी झाले आहे.
नवीन गाड्या वाढविण्यावरही भर दिल्याचे दिसत नाही. महामंडळाच्या ताफ्यात २0१२-१३ साली १७ हजार ४९७ बस होत्या. २0१३-१४मध्ये
५५८ बसची भर पडली. त्यानंतरच्या वर्षात ९८ बसेस कमी झाल्या.
२0१५-१६मध्ये ५४ बसची भर
पडली. आता एसटीच्या ताफ्यातील बसची संख्या ही १८ हजार ११ आहे. ताफ्यात गेल्या चार वर्षांत अवघ्या ५१४ नव्या बस दाखल झाल्या आहेत. एसटी महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीच्या बस ८ हजार किमी एवढ्या धावल्या की, सेवेतून बाहेर काढल्या जातात. वर्षाला साधारपणे ३ हजार बसेस मोडीत काढल्या जातात आणि तेवढ्याच ताफ्यात दाखल करून घेणे आवश्यक असते. मात्र हे प्रमाण पूर्ण केले जात नसल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे.

Web Title: Less than 16 crore passengers in four years of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.