ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड सध्या चर्चेत आहेत. विमान कंपन्यांनी ब्लॅक लिस्टेड केल्यानंतर रवींद्र गायकवाड एका खासदाराचे सहकारी बनून ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबईसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावरून लेखिका शोभा डे यांनी गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. गायकवाड यांना सायकलने प्रवास करून परत येऊ द्या अशा अर्थाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला विमानात मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र गायकवडांविरोधात काल (दि.24) दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला . एअर इंडियाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी देशातल्या प्रमुख एअरलाईन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकत, त्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे गायकवाड मुंबईत परतण्यासाठी ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने प्रवास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणावरून सोशल मिडीयात नेहमी चर्चेत असणा-या शोभा-डे यांनी गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. सर्व विमानकंपन्या रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी आणत आहे त्याचं अनुकरण भारतीय रेल्वेने करायला नको का ? गायकवाड यांना सायकलवरून मुंबईला परत येऊ द्या असं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर अनेक मजेशीर ट्विट त्यांच्या फॉलोअर्सनी केले आहेत.
So with all airlines banning Ravindra Gaikwad, shouldn't Indian Railways follow suit? Let Gaikwad cycle back to Mumbai.— Shobhaa De (@DeShobhaa) March 24, 2017