‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळा आज रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 04:07 AM2018-03-10T04:07:13+5:302018-03-10T04:07:13+5:30

उद्योगाची कास धरतानाच सामाजिक क्षेत्रालाही हातभार लावत यशाची शिखरे पादक्रांत करणाºया व्यक्तींना ‘लोकमत’तर्फे गौरविण्यात येणार आहे; निमित्त आहे ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’चे. १० मार्च (शनिवार) रोजी सायंकाळी ६ वाजता वरळी येथील फोर सिझनमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे

'Lokmat Corporate Excellence Award' will be celebrated today | ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळा आज रंगणार

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळा आज रंगणार

googlenewsNext

मुंबई  - उद्योगाची कास धरतानाच सामाजिक क्षेत्रालाही हातभार लावत यशाची शिखरे पादक्रांत करणाºया व्यक्तींना ‘लोकमत’तर्फे गौरविण्यात येणार आहे; निमित्त आहे ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’चे. १० मार्च (शनिवार) रोजी सायंकाळी ६ वाजता वरळी येथील फोर सिझनमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमाला कॉर्पोरेट क्षेत्रासह राजकीय, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे, पोलीस महानिरीक्षक कैसर खलिद, आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती, गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ॠषी दर्डा यांचीही उपस्थिती असेल.
सोहळ्यासाठी टायटल स्पॉन्सर मनी टेÑड कॉईन ग्रुप, पॉवर बाय मोहन ग्रुप, को-स्पॉन्सर साई इस्टेट कन्सल्टंट लिमिटेड, को-स्पॉन्सर रिजन्सी ग्रुप, ट्रॉफी पार्टनर ग्रीन लँड फार्म, आऊटडोअर पार्टनर रोनक अ‍ॅडर्व्हटायझिंग, फ्लेक्स पार्टनर विक्रांत अ‍ॅडर्व्हटायझिंग, ब्रेव्हरेज पार्टनर सुला वाईन्स, नॉलेज पार्टनर बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन हे प्रायोजक आहेत. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

- या सोहळ्यात ‘ड्राईव्हिंग बिझनेस एक्सलन्स’ या विषयावर परिसंवाद होईल. यात युनियन बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष केवल हंडा, हरीभक्ती ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेश हरीभक्ती, ‘एल अ‍ॅण्ड टी’च्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि वरिष्ठ उपाध्यक्ष योगी श्रीराम, जे.के. एंटरप्रायजेस मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत सिंघानिया, डाऊनस्ट्रीमचे सल्लागार आणि संचालक व बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष एम.डी. अग्रवाल, एफसीबी इंटरफेसचे उपाध्यक्ष नितीन भागवत सहभागी होणार आहेत.

‘क्वालिटी आॅफ कटेंट इन एंटरटेंटमेंट बिझनेस’ या अन्य एका विषयावरच्या परिसंवादात रेनड्रॉप मीडियाच्या संस्थापक आणि संचालक रोहिनी अय्यर, निर्मात्या प्रेरणा अरोरा, अभिनेत्री आणि निर्मात्या रवीना टंडन आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

Web Title: 'Lokmat Corporate Excellence Award' will be celebrated today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.