‘लक्ष्मी’ दर्शनावर नजर

By admin | Published: October 27, 2016 01:11 AM2016-10-27T01:11:17+5:302016-10-27T01:11:17+5:30

नगरपालिकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आयकर विभाग आणि बँकांची मदत घेण्याचे आदेश राज्य निवडणूक

Look at the 'Lakshmi' view | ‘लक्ष्मी’ दर्शनावर नजर

‘लक्ष्मी’ दर्शनावर नजर

Next

मुंबई : नगरपालिकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आयकर विभाग आणि बँकांची मदत घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणूक यंत्रणेला दिले. तसेच, सोशल मीडियाच्या गैरवापरावरदेखील आयोगाची करडी नजर असेल.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आयोगाच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित कार्यशाळेत राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी ही माहिती दिली. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य ा सचिव के. पी. बक्षी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, पोलीस महासंचालक सतीश माथूर, महापालिका आयुक्त अजॉय मेहता, मुंबईचे पोलिस आयुक्त डी. डी. पडसलगीकर, आयोगाचे सचिव शेखर चन्ने,विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह राज्यस्तरीय बँकर्स समितीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कुख्यात गुन्हेगारांची यादी करणे, अवैध शस्त्रे जमा करणे, भरारी पथके नियुक्ती करणे, नाका तपासणी करणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पेड न्यूजबाबत दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील अफवा अथवा अनुचित स्वरु पातील मजकुरावरही बारकाईने लक्ष
ठेवावे व त्याला वेळीच आळा घालावा. बँका आयकर विभागाच्या मदतीने रोख रकमांच्या व्यवहारावर लक्ष ठेवतानाच बस स्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ आदी ठिकाणांबाबतही सतर्कता बाळगावी. (विशेष प्रतिनिधी)

- शांततापूर्ण व भयमुक्त वातावरणात निवडणुकांची महाराष्ट्राची परंपरा यावेळीही कायम असेल, असा विश्वास स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केला. प्रचारसभा, प्रचारफेऱ्यांसाठी विविध परवानग्या एकाच खिडकीवर मिळाव्यात अशी अपेक्षा माथूर यांनी व्यक्त केली.

Web Title: Look at the 'Lakshmi' view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.