नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:55 PM2024-11-29T12:55:19+5:302024-11-29T12:56:28+5:30

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे नागपू मध्य विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. त्यामुळे त्यांची पक्ष संघटनेतून हकालपट्टी करून त्यांना पुन्हा संघामध्येच पाठवावे, अशी मागणी बंटी शेळके यांनी केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Nana Patole Sangh handiwork, send him to RSS itself, serious charge of the defeated Congress candidate   | नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  

नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात काँग्रेसचीही मोठी पिछेहाट झाली होती. तसेच एकेकाळी महाराष्ट्रात निर्विवाद सत्ता असणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये अंतर्गत  वादाला तोंड फुटू लागले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नागपू मध्य विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. त्यामुळे त्यांची पक्ष संघटनेतून हकालपट्टी करून त्यांना पुन्हा संघामध्येच पाठवावे, अशी मागणी बंटी शेळके यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे प्रवीण दटके विरुद्ध काँग्रेसचे बंटी शेकळे अशी लढत झाली होती. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भाजपाच्या प्रवीण दटके यांनी काँग्रेसच्या बंटी शेळके यांचा ११ हजार ६३२ मतांनी पराभव केला होता. या पराभवानंतर आता बंटी शेळके यांनी निवडणुकीदरम्यान झालेल्या असहाकार्यावरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे.

बंटी शेळके नाना पटोलेंवर टीका करताना म्हणाले की, डरो मत अशा संदेश आमचे नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. त्या संदेशानुसार मी य नाविडणुकीतील वस्तुस्थिती मांडत आहे. मागच्या निवडणुकीतही मी ४ हजार मतांनी पराभूत झालो होतो. त्यावेळीही नाना पटोले यांनी माझं कार करू नये अशी सूचना कार्यकर्त्यांना दिली होती. काही नियुक्त्या माझ्या विरोधात करण्यात आल्या होत्या. नागपूर मध्य मतदारसंघात कुणाला पद हव असल्यास माझ्यावर टीका करा असं सांगण्यात येत असे, असा दावाही बंटी शेळके यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून झालेल्या असहकार्याबाबत नाराजी व्यक्त करताना बंटी शेळके म्हणाले की, आमचे नेते राहुल गांधी यांनी मला उमेदवारी दिली होती. मात्र माझा घात होईल, अशी मला कल्पना नव्हती. पक्षाचं चिन्ह असूनही नागपूर मध्य मतदारसंघात माझी अवस्था ही अपक्ष उमेदवारासारखी झाली होती. येथून काँग्रेसची पूर्ण पक्षसंघटना गायब होती. काही बोटावर मोजण्याइतके कार्यकर्तेच माझ्याबरोबर होते. नाना पटोले यांनी इतर कार्यकर्त्यांची भाजपासोबत हातमिळवून घडवून आणली होती, असा आरोपही बंटी शेळके यांनी केला.  

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Nana Patole Sangh handiwork, send him to RSS itself, serious charge of the defeated Congress candidate  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.