Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 01:40 PM2024-11-23T13:40:44+5:302024-11-23T13:47:23+5:30

Vidhan Sabha Election Result 2024: शपथविधी झाल्यानंतर मुंबईत विधानसभेत शिंदेंनी आपल्यासोबत आलेले ५० आमदार पुन्हा निवडून आले नाहीत तर मी राजकारण सोडून निघून जाईन असं विधान केले होते. 

Maharashtra Assembly Election Result 2024: Vidhan Sabha Election Result 2024: Eknath Shinde Big shock to Uddhav Thackeray | Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का

Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का

मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश महायुतीला मिळालं आहे. या निवडणुकीत महायुती २२५ जागांवर आघाडी आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५६ हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. तर उद्धव ठाकरेंना जबर फटका बसला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ५० आमदारांपैकी एकही पडला तर राजकारण सोडेन असं विधान केले होते. या विधानावरून अनेकदा शिंदे यांची खिल्ली उडवण्याचं काम ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आले. मात्र निकालात एकनाथ शिंदेंनी जे बोलले ते करून दाखवलं.

जून २०२२ शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदेंसोबत जवळपास ४० आमदार ठाकरेंना सोडून गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंसोबत सर्व आमदारांवर घणाघाती टीका केली होती. निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंना त्यांनी केलेल्या विधानाची आठवण करून दिली. अंधारे म्हणाल्या की, सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही असा खोचक टोला लगावला. 

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष असे ५० आमदार होते. उद्धव ठाकरेंचे सरकार शिंदेंनी भाजपाच्या साथीने उलथविले होते. शपथविधी झाल्यानंतर मुंबईत विधानसभेत शिंदेंनी आपल्यासोबत आलेले ५० आमदार पुन्हा निवडून आले नाहीत तर मी राजकारण सोडून निघून जाईन असं विधान केले होते. 

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांचे टेन्शन होते. त्यांचे वाईट होऊ नये. यांच्यापैकी एकही पडणार नाही. एक माणूस जरी पडला तरी मी राजकारण सोडून निघून जाईन, सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीत निवडून आणणारच, असे शिंदे म्हणाले होते. महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण पक्षातील काही नेत्यांनी खोडा घातला, असे म्हणताना शिंदे यांनी कोणाचे नाव घेतले नाही.  

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024: Vidhan Sabha Election Result 2024: Eknath Shinde Big shock to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.