विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. महायुती १४८, मविआ १३१, इतर १२ जागांवर आघाडीवर आहेत. एकंदरीतच प्रत्येक मतदारसंघात टफ फाईट होताना दिसत आहे. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठी बातमी येत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्सअजित पवारांनी बारामतीत पहिल्या फेरीत 3623 मतांनी आघाडी घेतली आहे. अजित पवार यांना पडलेली मते 9291 आहेत तर युगेंद्र पवार यांना पडलेली मते 5,668 आहेत. अशातच येवल्यामध्ये छगन भुजबळ हे पिछाडीवर पडले आहेत. तर अणुशक्ति नगरमधून देखील राष्ट्रवादीचे नवाब मलिक पिछाडीवर गेले आहेत. नांदगावमधून बंडखोरी केलेले भुजबळांचे पुतणे देखील पिछाडीवर गेले आहेत. झीशान सिद्दीकी देखील पिछाडीवर पडलेले आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क २० नोव्हेंबरला बजावला होता. मतदानाची टक्केवारी ६६.०५ इतकी होती. १५८ लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष असे मिळून ४ हजार १३६ उमदेवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.