महाराष्ट्रात विभाजनवादी शक्तींचा पराभव. मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची स्तुती करतो. महाराष्ट्रात सुशासनाचा, सत्याचा विजय झाला आहे. देशात अन्य ठिकाणी देखील पोटनिवडणुका झाल्या. सर्वच राज्यांत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. देश फक्त आणि फक्त विकासाची मागणी करत आहे. मी देशाच्या जनतेला नमस्कार करतो. मी झारखंडच्या जनतेलाही नमस्कार करतो. झारखंडच्या वेगाने विकास करण्यासाठी आम्ही आणखी ताकदीने काम करणार. भाजपाचा एकेक कार्यकर्ता काम करणार, असल्याचे मोदी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे आज दाखवून दिले. शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे अशा महान व्यक्तीमत्वांच्या भूमीने जुने सर्व रेकॉ़र्ड तोडले आहेत. गेल्या ५० वर्षांत कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही आघाडी-युतीसाठी हा सर्वात मोठा विजय आहे, असे मोदी म्हणाले.
सतत तिसऱ्यांदा भाजपाच्या नेतृत्वात कोणत्या युतीला विजयी केले. तसेच भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनण्याची सलग तिसरी वेळ आहे. महाराष्ट्र देशातील सहावे राज्य आहे ज्याने भाजपाला सतत तीनवेळा जनादेश दिला आहे. यापूर्वी गोवा, गुजरात, छत्तीसगढ, हरियाणा आणि मध्य प्रदेशात सतत तीनवेळा जिंकलो आहोत. बिहारमध्येही एनडीएला तीनवेळा जनादेश मिळाला आहे. आणि ६० वर्षांनी तुम्ही मला तिसऱ्यांदा संधी दिली, असे मोदी म्हणाले.
या जनतेची सेवा करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही. सतत तिसऱ्यांदा स्थिरतेला निवडणे महाराष्ट्राच्या जनतेच्या सामंजस्यातून दिसते. मध्ये काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली. महाराष्ट्राने त्यांना नाकारले आहे. त्याची शिक्षा त्यांना संधी मिळताच जनतेने दिली आहे. या जनतेने जे दिलेय ते विकसित भारतासाठी मोठा आधार ठरणार आहे. हरियाणानंतर महाराष्ट्राच्या जनतेने एकजुटतेचा संदेश दिला आहे, असे मोदी म्हणाले.
काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांच्या कटाला या राज्याने एक है तो सेफ हैने उत्तर दिले. जाती धर्म भाषा आणि क्षेत्राच्या नावावर लढविणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकविला आहे. आदिवासींनी, ओबीसी, दलितांनी भाजपाला मतदान केले. आमच्या सरकारने मराठीला सांस्कृतीक भाषेचा दर्जा दिला. मातृभाषेचा सन्मान आमच्या संस्कारात आहे, असे मोदी म्हणाले.