Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:31 PM2024-11-23T18:31:33+5:302024-11-23T18:32:46+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: ज्या प्रकारे लँडस्लाइड झाली त्यामुळे फारच जास्त आनंद झाला, असे प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर दिले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. जवळपास सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. महायुतीचा दणदणीत विजय झाला असून, महाविकास आघाडी चांगलीच चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अद्यापही अनेक ठिकाणचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले आहे.
महायुतीतील भाजपाचे १३७ जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत, शिवसेना शिंदे गटाचे ५७ जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत, तर अजित पवार गटाचे ४१ जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. यानंतर अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत, “या दणदणीत विजयासाठी मला एक शब्द सांगा ..!”, असे म्हटले होते. यावर हजारो जणांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का?
प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, आज मला फार आनंद होत आहे. ज्या पद्धतीने महायुतीने आघाडी मिळवली आहे, त्यामुळे मी फार आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का, असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, आतापर्यंत महायुतीत प्रत्येकाने स्वत:चे १०० टक्के देत काम केले आहे. त्यामुळे यापुढील निर्णय आमचे वरिष्ठ एकत्र येऊन घेतील, असे अमृता फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, आजचा दिवस फार छान आणि आनंदाचा आहे. त्यामुळे आपण वाईट गोष्टी अजिबात मधे आणायच्या नाहीत. आम्ही सर्व एकत्र येऊन निकाल पाहत होतो. आम्हाला विजयाची अपेक्षा होतीच. मात्र, ज्या प्रकारे ही लँडस्लाइड झाली त्यामुळे फारच जास्त आनंद झाला, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.