Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी ९.३० पर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपा सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुती १७१ जागांसह आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी ११० जागांवर आघाडीवर आहेत. तर ६ अपक्षांना आघाडी मिळाली आहे. महायुतीत भाजपा आघाडीवर आहे. भाजपा ९७ जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना शिंदे गट ४१ जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी गट ३३ जागांवर आघाडीवर आहे.
महाविकास आघाडीचा विचार केल्यास काँग्रेस ३९ जागांवर आघाडीवर आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३५ जागांसह आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गट ३६ जागांवर आघाडीवर आहे. यातच मनसेला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. बहुचर्चित माहीम मतदारसंघात अमित ठाकरे पिछाडीवर आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील पिछाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीलाही एकाही ठिकाणी आघाडी घेता आलेली नाही, असे सुरुवातीला हाती आलेल्या कलांवरून पाहायला मिळत आहे.