Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 06:22 PM2021-04-26T18:22:04+5:302021-04-26T18:23:09+5:30

Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्राला कोरोना काळात अधिक मदत मिळाली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका, रामदास आठवले यांचं वक्तव्य

maharashtra coronavirus minister ramdas athawale on corona vaccine remdesivir oxygen mumbai | Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले

Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राला कोरोना काळात अधिक मदत मिळाली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका, रामदास आठवले यांचं वक्तव्यराज्यातील मृत्यूंना जबाबदार कोण, आठवले यांचा सवाल

"मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राला कोरोना काळात अधिक मदत मिळाली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्राला ऑक्सिजन, लस आणि रेमडीसीविर इंजेक्शनचा देशात सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला केला आहे. केंद्राने कधी ही महाराष्ट्राशी दुजाभाव केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्राकडे लक्ष आहे," असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

"महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही वेळ आरोप करण्याची नाही. केंद्रावर आरोप करण्यापेक्षा रुग्णांचे जीव वाचविण्याकडे लक्ष द्यावे.महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांनी कोरोना रुग्ण वाचविण्याकडे, कोरोनाचा लाट थोपविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, रेमेडिसीवर इंजेक्शन मिळत नाही त्याकडे लक्ष द्यावे. उगाच केंद्र सरकार वर आरोप करून आपले पाप  झाकता येणार नाही," असा टोला ना रामदास आठवले राज्य सरकारला लगावला.

मागील वर्षी महाराष्ट्रात कोविड सेंटर उभारण्यात आले होते. यंदा कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारने योग्य सोयी सुविधा नियोजन केले नाही. त्यामुळे राज्यात अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यास कोण जबाबदार असा सवाल रामदास आठवले यांनी राज्य सरकारला विचारला आहे. "केवळ केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा रुग्णांचे जीव वाचविण्याकडे लक्ष द्यावे," अशी सूचना आठवले यांनी राज्य सरकारला केली आहे.

Web Title: maharashtra coronavirus minister ramdas athawale on corona vaccine remdesivir oxygen mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.