मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बीड जिल्ह्यातून आपल्या प्रचारसभांना सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी कलम 370 हटविल्याने न्याय मिळाला आहे. हा निर्णय घेण्यात आला तेव्हा विरोधकांनी याला प्रचंड विरोधात झाला. भाजप पक्षाच्या जन्मापासून कलम 370 ला विरोध करत आहे. हा राजनीतीचा निर्णय नसून देशहिताचा निर्णय आहे, असे म्हणत मोदींनी परळीत गर्जना केली. तसेच या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र, भाजपा अन् मोदींना गोपीनाथ मुंडेंचा विसर पडल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.
दिवंगत लोकनेत्याचा अपमान कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. आज मोदींच्या सभांसाठी छापलेल्या जाहिरातीत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा साधा फोटोही नव्हता. मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता, दिवंगत लोकनेत्याचा अपमान कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असल्याचे म्हणत धनंजय मुंडेंनी भाजपा सरकारला गोपीनाथ मुंडेंचा विसर पडल्याचं म्हटलंय.
या विधानसभेची निवडणूक ही इमानदारी विरुद्ध बेईमानीची आहे. सर्व कार्यकर्ते आणि शरद पवारांच्या संगनमताने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. मात्र, उमेदवारी दिल्यानंतरही त्यांनी पक्षांतर केले. याला म्हणतात बेईमानी, या बेईमानीला केजच्या मातीत गाडा, असेही मुंडेंनी येथील सभेत म्हटले.