महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक संमत
By Admin | Published: August 3, 2016 03:43 AM2016-08-03T03:43:01+5:302016-08-03T03:43:01+5:30
सभागृहाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आणल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी गोंधळातच विषयपत्रिकेवरील कामकाज रेटून नेले.
सुरेश काटे,
तलासरी- रोजगार हमीच्या रस्त्याच्या कामावर तीन वर्षापूर्वी काम करूनही अजून १२५ मजुरांना मजुरी न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. ती तात्काळ न दिल्यास मजुरासह तलासरी पंचायत समिती कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी दिला असून हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
तलासरी तालुक्यातील मौजे उधवा जांभळूनपाडा येथे सन २०१३-२०१५ मध्ये रोजगार हमीतून ग्रामपंचायतीने रस्त्याची कामे केली त्याचे तीन मस्टर मजुरांच्या नावे पोस्टाच्या अकाउंट नंबर सह ग्रामपंचायतीने पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागात जमा केली. पहिल्या मस्टर मधील रु पये २४६०० , दुसऱ्या मस्टर मधील रु पये १३९८३ व तिसऱ्या मस्टर मधील रु पये ४५९०४ अशी १२५ मजुरांची एकूण ८४४८७ रु पयांची मजुरी बाकी आहे.
तीन वर्षा पासून हेलपाटे मारून दमलेल्या मजुरांनी शेवटी चौधरी यांना साकडे घातले आहे. त्यांनी लोकमत वार्ताहर सह रोजगार हमी विभागात चौकशी केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तरे देऊन नंतर तीन मस्टर ची १२५ मजुरांची मजुरी बाकी असल्याचे सांगितले पोस्टाचे अकाउंट नंबर अपडेट नसल्याने रक्कम अदा झाली नसल्याचे सांगितले पण मजुरी देण्या बाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून आले.
>चर्चा नाही बैठका ठरल्या वांझोट्या
रोजगार हमीच्या कामाबाबत दर पंधरा दिवसांनीगट विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक बोलाविण्यात येते या बैठकीत फक्त याच कामांची चर्चा होते.
परंतु त्यात आजवर ना थकीत मजुरी बाबतची माहिती पटला वर ठेवली गेली ना चर्चा झाली. अशा ढिसाळ कारभारमुळे हे मजूर मजुरीपासून वंचित राहीले आहेत. पण याचे सोयरसुतक कोणालाही नाही.
>पोस्टातील खात्याची योग्य ती कागद पत्रे देऊन खाते अपडेट करणे आवश्यक आहे खाते अपडेट नसल्याने ब्लॉक झाली आहेत
- पोस्ट कार्यालय तलासरी
>ग्रामसेवक व रोजगार सेवक मजुरीचे मस्टर रोजगार हमी योजना विभागात दिल्या नंतर या विभागाकडे फिरकतही नाहीत त्या मुळे मस्टर मधील त्रुटी काढणे अवघड जाते.
- रो.ह.योजना विभागातील कर्मचारी