Maharashtra Government: शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं साधलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 11:21 AM2019-11-27T11:21:25+5:302019-11-27T11:23:25+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले होते.
मुंबई : भाजपने माघार घेतल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसनेचा सत्तेस्थापनेचा मार्गे मोकळा झाला असून, गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. शिवसनेने मुख्यमंत्रीपदासाठी भाजप विरोधात पहिल्यापासूनचं आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षात उभी फुट पडली आणि शिवसनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी बाकावर तर भाजप-शिवसनेने एकत्र येत सरकार स्थापन केली होती. त्यांनतर २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजप-शिवसेना पक्षाने युती करून निवडणूक लढवली होती. त्यांनतर आलेल्या निकालानुसार जनतेने युतीला सत्तेत तर महाआघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला होता.
मात्र भाजप आणि शिवसेना ह्या दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जात होता. तर शिवसनेने मुख्यमंत्रीपदासाठी थेट भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले होते. काहीही झाले तर मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकच बसणार अशी त्यांनी शेवटपर्यंत भूमिका कायम ठेवली. त्यामुळे भाजप-शिवसेना वेगळे झाले आणि महाविकासआघाडीची निर्मिती झाली.
मुख्यमंत्री कोणत्याही परिस्थितीत आमचाच होणार अशी मागणी करणाऱ्या शिवसेनाला या दोन्ही पक्षांनी पाठींबा देत मुख्यमंत्रीपद सुद्धा देण्याची तयारी दर्शवली. तर भाजपचा हात सोडून शिवसनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे जनतेने विरोधात बसण्याचे कौल देऊन सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ते बसण्याची संधी साधली असल्याचे पाहायला मिळाले.