महिला, तरुणी बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 12:22 PM2020-02-05T12:22:33+5:302020-02-05T12:27:31+5:30

2016 पासून 2018 पर्यंतेची आकडेवारी पहिली तर महाराष्ट्रात महिलांची बेपत्ता होण्याची नोंद सर्वाधिक आहे.

Maharashtra number one in disappearance of women | महिला, तरुणी बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

महिला, तरुणी बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

googlenewsNext

मुंबई : राज्यात चार दिवसात जळीतकांडाच्या तीन घटना समोर आल्याने महाराष्ट्रातीलमहिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न पडत आहे. त्यातच आता महिला, तरुणी बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डचा ब्युरोचा अहवालानुसार देशात सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्याची नोंद महाराष्ट्रात झाली असल्याचे समोर आले आहे.

एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार, नॅशनल क्राईम रेकॉर्डचा ब्युरोचा 2016-17 आणि 2018 च्या अहवालानुसार बेपत्ता झालेल्या मुली, महिलांच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक लागलाय. तर महाराष्ट्र पाठोपाठ मध्यप्रदेशातून सर्वाधिक महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण असल्याचे समोर आले आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हे देशभरातील राज्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची नोंदणी करत असतो. त्यांनी दाखल केलेल्या नोदंणीनुसार 2016 पासून 2018 पर्यंतेची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात महिलांची बेपत्ता होण्याची नोंद सर्वाधिक आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्डचा ब्युरोच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात 2016 मध्ये 24 हजार 937 मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तर 2017 ला 28 हजार 133 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. तर 2018 साली 31 हजार 299 महिला व मुली गायब झाले आहे. त्यामुळे वरील या तीन वर्षात 84 हजार 369 महिला आणि मुली बेपत्ता आहे.

 

Web Title: Maharashtra number one in disappearance of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.