बंडखोर आता बिनखात्याचे मंत्री, ९ जणांची खाती इतर मंत्र्यांकडे; कामे थांबू नयेत यासाठी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:45 AM2022-06-28T06:45:08+5:302022-06-28T06:47:42+5:30
बंडखोर मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अजूनही घेतलेला नाही. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने या मंत्र्यांबाबत निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव यांना दिले होते.
मुंबई : बंडखोर नऊ मंत्र्यांकडील खाती शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांकडे सोपवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना धक्का दिला आहे. बंडखोरांना बिनखात्याचे मंत्री म्हणून कायम ठेवले आहे. जनहिताची कामे अडकून राहू नयेत व सर्व विभागांचे कामकाज सुरळीत राहावे यासाठी पाच कॅबिनेट व चार राज्यमंत्र्यांकडील कारभार अन्य मंत्र्यांकडे सोपविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
हकालपट्टी नाहीच
बंडखोर मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अजूनही घेतलेला नाही. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने या मंत्र्यांबाबत निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव यांना दिले होते. त्यामुळे या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी चर्चा होती. तथापि, असा डच्चू न देता ठाकरे यांनी त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे ठेवल्याचे म्हटले जाते.