Coronavirus: सकारात्मक! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०६ टक्के; २४ तासांत १० हजार ५४८ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:02 PM2021-07-06T21:02:31+5:302021-07-06T21:06:09+5:30

Coronavirus: गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार ४१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

maharashtra reports 8418 new corona cases and 171 deaths in last 24 hours | Coronavirus: सकारात्मक! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०६ टक्के; २४ तासांत १० हजार ५४८ जण कोरोनामुक्त

Coronavirus: सकारात्मक! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०६ टक्के; २४ तासांत १० हजार ५४८ जण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार ४१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदयाच कालावधीत १७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूमुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ८२२ दिवसांवर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १० हजार ५४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.०६ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार ४१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 8418 new corona cases and 171 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ८ हजार ४१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १० हजार ५४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ७२ हजार २६८ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख १४ हजार २९७ आहे. 

मुंबईकरांना काहीसा दिलासा

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ४५३ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ४८२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ५६४ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ७ हजार ९०८ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ८२२ दिवसांवर गेला आहे. 

दरम्यान, राज्यात एकूण ४ कोटी २९ लाख ०८ हजार २८८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख १३ हजार ३३५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ६ लाख ३८ हजार ८३२ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ४४७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 
 

Web Title: maharashtra reports 8418 new corona cases and 171 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.