बलात्कारांमध्ये महाराष्ट्र तिसरा- खुशालचंद बाहेती; शिर्डीत महिला कायदेविषयक कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:14 AM2018-03-04T02:14:44+5:302018-03-04T02:14:44+5:30
दहा वर्षांत बलात्काराचे प्रमाण दुप्पट झाले असून, बलात्कारांच्या घटनेत महाराष्ट्र देशात तिसºया स्थानावर आहे. महिला विषयक कायदे कडक करूनही गुन्हे घडण्याच्या प्रमाणात घट होत नसल्याबद्दल व गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण कमी असल्याची खंत औरंगाबादचे निवृत्त पोलीस उपायुक्त खुशालचंद बाहेती यांनी चिंता व्यक्त केली.
शिर्डी : दहा वर्षांत बलात्काराचे प्रमाण दुप्पट झाले असून, बलात्कारांच्या घटनेत महाराष्ट्र देशात तिसºया स्थानावर आहे. महिला विषयक कायदे कडक करूनही गुन्हे घडण्याच्या प्रमाणात घट होत नसल्याबद्दल व गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण कमी असल्याची खंत औरंगाबादचे निवृत्त पोलीस उपायुक्त खुशालचंद बाहेती यांनी चिंता व्यक्त केली़
महिला विषयक कायद्यांचे सक्षमीकरण व प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य महिला आयोग व स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी येथे राज्यस्तरीय महिला कायदेविषयक कार्यशाळा झाली. शिवसेना आमदार डॉ़ नीलम गोºहे यांच्या अध्यक्षस्थानी होत्या. राज्य महिला आयोगाच्या सदस्य विंदा किर्तीकर, द्योजिका सुप्रिया बडवे, संगमनेरच्या दुर्गाताई तांबे, सावित्रीबाई प्रतिष्ठानच्या संगीता मालकर, माजी नगराध्यक्षा अनिता जगताप आदी प्रमुख पाहुणे होते.
न्यायव्यवस्थेचा महिलांसाठी पुढाकार - आ. गो-हे
महिलांविषयीच्या कायद्याच्या कठोर व निर्दोष अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची आ. डॉ. नीलम गोºहे यांनी माहिती दिली. गुन्हेगारांना शिक्षा होईल, असा फॉर्म्युला तयार करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली़