Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 01:32 PM2024-11-23T13:32:31+5:302024-11-23T13:35:10+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : येथे देवेंद्र फडणवीस यांनी सहाव्यांदा विजयश्री खेचून आलणली आहे. यातच, आता महायुतीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासंदर्भातही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यामुळे राज्याला पुढचा नवा मुख्यमंत्री कोण मिळतो हे बघणे महत्वाचे ठरेल...
राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालात संपूर्ण राज्यातच महायुतीला मोठे यश मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ होताना दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला संपूर्ण राज्यात मोठा फटका बसला होता. मात्र आता, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ती कसर भरून काढताना दिसत आहे. यातच, राज्यासह संपूर्ण देशाची नजर असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी आली आहे. येथे देवेंद्र फडणवीस यांनी सहाव्यांदा विजयश्री खेचून आलणली आहे. यातच, आता महायुतीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासंदर्भातही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यामुळे राज्याला पुढचा नवा मुख्यमंत्री कोण मिळतो हे बघणे महत्वाचे ठरेल.
नागपूर दक्षिम-पश्चिम विधानसभा मतदारसंघात विरोधकांना भाजपचा अश्वमेध यावेळीही रोखता आला नाही. येथे, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात होते. त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचा मोठा पराभव केला आहे. महत्वाचे म्हणजे, निकाल यायला सुरुवात झाल्यापासून फडणवीस आघाडीवर होते. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, ते आज आपल्या नागपूर येथील निवासस्थानी जाणार असल्याचे समजते.
फडणवीसच मुख्यमंत्री होतील -
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. "आता मुख्यमंत्री हा महायुतीचाच बनणार आहे. जो पक्ष मोठा आहे, त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात येते. भारतीय जनता पक्ष सवाशेच्या आसपास पोहोचणार असून भाजप मोठा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा बनणार आहे. यामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
बघा लाइव्ह ब्लॉग :
Watch Live Blog >> https://tinyurl.com/mv93wesh
आम्हाला विजयाची खात्री होती -
याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारले होते, त्यासाठी हम सब एक है चा नारा जनतेने मान्य केला. केंद्रात भाजपचे सरकार, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळे अधिक मतदान झाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असे वाटले नव्हते. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, असे प्रवीण दरेकर म्हणाले.