Maharashtra Election Results 2024:'या' नेत्यांना मतदारांनी लोकसभेनंतर विधानसभेलाही दिला दणका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:46 PM2024-11-23T18:46:08+5:302024-11-23T18:53:29+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांचा पुन्हा पराभव झाला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights candidates who lost in the Lok Sabha have been defeated again in the assembly elections | Maharashtra Election Results 2024:'या' नेत्यांना मतदारांनी लोकसभेनंतर विधानसभेलाही दिला दणका!

Maharashtra Election Results 2024:'या' नेत्यांना मतदारांनी लोकसभेनंतर विधानसभेलाही दिला दणका!

Maharashtra Assembly Election 2024 Results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल लागले असून दिग्गजांचा पराभव झाला आहे.  लोकसभेत चांगली कामगिरी केल्यानंतर विधानसभेला महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत असेही उमेदवार निवडणूक लढवत होते ज्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीतही या उमेदवारांना यश मिळवता आलेलं नाही. यामध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याही उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवरांचा पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर, शशिकांत शिंदे, संजयकाका पाटील, यामिनी जाधव, राम सातपुते या उमेदवारांना विधानसभेतही यश मिळवता आलेलं नाही.

यामिनी जाधव 

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा महाविकास आघाडीच्या अरविंद सावंत यांनी पराभव केला होता. अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा ५२,६७३ मतांनी पराभव केला होता. अरविंद यांना ३,९५,६५५ आणि यामिनी यांना ३,४२,९८२ मते मिळाली होती.

विधानसभा निवडणुकीतही यामिनी जाधव यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ठाकरे गटाच्या मनोज जामसुतकर यांनी यामिनी जाधव यांना पराभूत केलं आहे. यामिनी जाधव यांना ४८७७२ तर जामसुतकर यांना ८०१३३ मते मिळाली आहेत.

रवींद्र धंगेकर

लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा १ लाख २३ हजार ३८ मतांनी पराभव केला होता. मुरलीधर मोहोळ यांना ५ लाख ८४ हजार ७२८ मते मिळाली. तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना ४ लाख ६१ हजार ६९० मते मिळाली होती.

विधानसभा निवडणुकीतही रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे. धंगेकरांना कसबा पेट मतदारसंघातून ७०६२३ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या हेमंत रासने यांना ९००४६ मते मिळाली आहे. धंगेकर यांचा १९४२३ मतांनी पराभव झाला आहे.

शशिकांत शिंदे

लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातील महायुतीचे उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार ७७१ मतांनी दणदणीत पराभव केला होता.  उदयनराजेंना ५ लाख ७१ हजार १३४ तर राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदेंना ५ लाख ३८ हजार ३८३ मते मिळाली होती. उदयनराजे ३२ हजार ७७१ मतांनी विजयी झाले होते.

विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांचा अजित पवार गटाच्या महेश शिंदे यांनी ४३३२५ मतांनी पराभव केला आहे. शशिकांत शिंदे यांना ९८८१७ तर महेश शिंदे यांना १४२१४२ मते मिळाली आहेत.

संजयकाका पाटील

सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांना ५ लाख ६९ हजार ६८७ मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी भाजपचे संजयकाका पाटील यांना ४ लाख ६८ हजार ५९३ मते मिळाली होती.

विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी अजित पवार गटाकडून तासगाव-कवठे-महांकाळ मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र इथेही प्रतिस्पर्धी रोहित पाटील यांनी त्यांचा पराभव केला आहे. शरद पवार गटाच्या रोहित पाटील यांना १२८४०३ मते मिळाली तर संजयकाका पाटील यांना १००७५९ मते मिळाली आहेत.

राम सातपुते

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंचा ७४,८१४ मतांनी पराभूत केलं.

माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकरांनी राम सातपुते यांचा १३१४७ मतांनी पराभूत केला आहे. राम सातपुते यांना १०८५६६ मते मिळाली आहेत. 
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights candidates who lost in the Lok Sabha have been defeated again in the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.