संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहे. यात जनतेने महायुतीच्या बाजूने मोठा कौल दिला आहे. राज्यात मोठ्या बहुमताने महायुतीचे सरकार स्थानप होताना दिसत आहे. दरम्यान, महायुतीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासंदर्भातही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यातच आता भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आली आहे. "देवेंद्र यांची अविश्रांत मेहनत आणि लोकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम, या दोन्ही गोष्टींनी त्यांना हा मोठा विजय मिळवून दिला आहे. आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे आणि पाच वर्षांच्या अनुभवांनंतर तो अतिशय उत्कृष्टपणे काम करेल," असे सरिता फडणवीस यांनी म्हटले आहे. त्या पत्रकारांसोबत बोलत होत्या. महाराष्ट्राची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे? असे विचारले असता, सरिता फडणवीस म्हणाल्या, "यावरून आपण हे समजू शकतो की, महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्र यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवावे. दरम्यान, मधल्या काळात विरोधकांकडून झालेल्या आरोप प्रत्यारोपांसदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, "मला कधीच आरोप-प्रत्यारोपांमध्ये तथ्य वाटत नाही, कारण माझा मुलगा काय आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे. त्यामुळे मी कधीच त्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही.
लाडक्या बहिणींसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, "लाडक्या बहिणींचे तर हे यश आहेच. पण देवेंद्र यांची अविश्रांत मेहनत आणि लोप्रियता याचेही हे यश आहे. मला मुलगी नव्हती, त्यामुळे एवढ्या साऱ्या मुली मला मिळाल्या," असेही त्या म्हणाल्या.
बघा लाइव्ह ब्लॉग : Watch Live Blog >>
तो मुख्यमंत्री होणार आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे काम करेल -देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल का? असे विचारले असता, "मी त्याला मुख्यमंत्री म्हणून पाहिले आहे. त्याने किती चांगले काम केले, लोकांनी किती प्रशंसा केली, हे पण मला माहित आहे. आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे आणि पाच वर्षांच्या अनुभवांनंतर तो अतिशय उत्कृष्टपणे काम करेल," असे सरिता फडणवीस म्हणाल्या.