Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:29 AM2024-11-23T10:29:24+5:302024-11-23T10:31:41+5:30

Key Highlights of Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महत्वाचे म्हणजे आतापर्यंत निवडणुकीचे निकाल घासून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र तसे होताना दिसत नाही. आतापर्यंतच्या निकालानुसार, जनता महायुतीला एकहाती सत्ता देताना दिसत आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Mahayuti's double century and took the lead on 212 seats; Mavia's big retreat, this is the picture so far | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights  : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज येत आहे. मतमोजणी सुरू आहे. निकालाचे कल हाती येत आहेत. यानुसार, आतापर्यंत भाजपने द्वि शकत पूर्ण  करत 212 जागांची आघाडी घेतली आहे. तर मविआची 100 जागांपर्यंत पोहोचण्यासही दमछाक होताना दिसत आहे. आतापर्यंत भाजप 114 जागांसह आघाडीवर असून पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष दिसत आहे. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत निवडणुकीचे निकाल घासून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र तसे होताना दिसत नाही. आतापर्यंतच्या निकालानुसार, जनता महायुतीला एकहाती सत्ता देताना दिसत आहे.

आतापर्यंतच्या निकालानुसार, सत्तेसाठी लागणारा 145 जागांचा आकडा महायुतीने कधीच ओलांडला आहे. सध्या महायुती 214 जागांनी आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीची दारून पिछेहाट होताना दिसत आहे. ज्या ठिकाणी महायुतीने 214 जागांवर आघाडीवर आहे, तेथे महाविकास आघाडी केवळ 66 जागांवरच आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Results 2024

आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, महायुतीकडून भारतीय जनता पार्टी 114, शिवसेना 58, राष्ट्रवादी काँग्रेस 42 तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 21, शिवसेना ठाकरे गट 20 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 25 तर इतर 8 जागांवर आघडीवर आहेत. 
 

Web Title: maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Mahayuti's double century and took the lead on 212 seats; Mavia's big retreat, this is the picture so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.