मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:25 PM2024-11-23T12:25:41+5:302024-11-23T12:27:01+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असले तरी महायुती २१९, मविआ ५७, इतर १२ असा कल आहे. महायुतीच्या या जोरदार मुसंडीमध्ये एक दोन नाही तर ही दहा कारणे महत्वाची ठरली आहेत. 

maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: Mavia's Panipat...! These ten strong reasons for Mahayuti's demise; Uddhav Thackeray, Sharad Pawar's sympathy faded... | मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...

मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...

Maharashtra Assembly Election 2024 Results reason: राज्यात महायुतीने प्रचंड बहुमताकडे वाटचाल केलेली आहे. महाविकास आघाडीची एवढी धुळधान उडाली आहे की विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही मिळताना मुश्कील बनत चालले आहे. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असले तरी महायुती २१९, मविआ ५७, इतर १२ असा कल आहे. महायुतीच्या या जोरदार मुसंडीमध्ये एक दोन नाही तर ही दहा कारणे महत्वाची ठरली आहेत. 

लोकसभेला महायुतीला मोठा फटका मिळाला होता. संविधान बचावचा काँग्रेसने केलेला वार भाजपाला वाचविता आला नाही. परंतू, यापासून भाजपाने धडा घेतला आणि महाविकास आघाडीचे फेक नेरेटीव्ह कसे असते हे वारंवार सांगत जनतेत प्रचार सुरु केला होता. 

यानंतर मध्यप्रदेशमध्ये लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना आणून महायुतीने महिलांमध्ये उत्साह आणला, एवढा की मोठ्या प्रमाणावर महिलांनी बाहेर पडत मतदान केले. मविआने ३००० रुपये देण्याचे सांगितले तरी जे देतायत त्यांनी २१०० केल्याने महिलांनी त्यांच्यावर जास्त विश्वास दाखविला.  

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान मोदींनी 'एक है तो सेफ है'चा नारा दिला. त्यातच काँग्रेसला मुस्लिम संघटनांचे पाठिंब्यांच्या अटीचे पत्र व्हायरल झाले, या लोकांचे नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आणि हिंदुत्ववादी मते एकगठ्ठा महायुतीच्या बाजुने फिरली. जे मविआच्या बाजुचे होते त्यांचेही मतपरिवर्तन झाले आणि त्यांचीही मते महायुतीकडे वळली. 

लोकसभेला मराठा आरक्षणाचा फटका महायुतीला बसलेला परंतू यामुळे सावध झालेल्या ओबीसींनी यावेळी मतांचे ध्रुवीकरण टाळले आणि सर्व ताकद भाजपाच्या बाजुने वळविली. याचा फायदा महायुतीला मोठ्या प्रमाणावर झाला. 

राज्यात मराठ्यांचे वर्चस्व लोकसभेला दिसलेले. परंतू, शिंदेंनी जाहीर केलेले आरक्षण तरीही जरांगेंची धरसोडची भूमिका आणि राजकारण यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर भाजपकडे परतला. जरांगे फॅक्टर पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला आहे. यामुळे आता पुढे मराठा आरक्षणाचे काय होणार हा देखील मोठा प्रश्न मराठा आंदोलकांसमोर असणार आहे. 

लोकसभेला अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका भाजपला बसला होता. आरएसएसच्या मतदारांनी भाजपाला मनापासून पाठिंबा दिलेला नव्हता. यामुळे विधानसभेला हा डॅमेज कंट्रोल करण्यात आला आणि आरएसएसच्या नेत्यांनीही मोठ्या ताकदीने भाजपाला रसद पुरविली. 

आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे नेहमीप्रमाणे काँग्रेस नेते गाफील राहिले. महाराष्ट्रात लोकसभेत मिळालेल्या यशावरच अवलंबून राहिले. मोदींनी घेतल्या त्याच्या निम्म्या सभाही काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी घेतल्या नाहीत. वारे आपल्याबाजुने असल्याचे गृहीत धरून राज्यातील काँग्रेस नेते आपापसातच मी मुख्यमंत्री, मी मुख्यमंत्री होणार असे शह काटशहाचे राजकारण खेळत राहिले, याचा परिणाम मतदारांवर झाला. 

उद्धव ठाकरेंना सहानुभुती होती, लोकसभेला ती दिसलीही होती. परंतू, त्याच्या जोरावर उद्धव ठाकरेंनी ज्या जागा जिंकताही येणार नाहीत त्या जागांसाठी हट्ट धरला. प्रसंगी काँग्रेससोबत वादंगही झाला. नाना पटोलेंना बाजुला करण्यात आले. कोकण पट्टयात उद्धव ठाकरे गटाचा सुपडा साफ होताना दिसत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील जिथे उमेदवार निवडून येऊ शकत नाही, जिथे इतर मित्र पक्षांचे तगडे उमेदवार आहेत त्या जागांवर ठाकरेंनी उमेदवार दिले असे वक्तव्य केले होते. 

या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांकडे पाहिले जात होते. त्यांचे वय, ते करत असलेला संघर्ष आदी गोष्टी चर्चेत होत्या. अजित पवारांनी लोकसभेला थेट टीका करण्याची जी चूक केलेली ती टाळली होती. यामुळे शरद पवारांबदद्ल असलेली सहानुभूती जवळजवळ ओसरली. काही भागापुरतीच मर्यादित राहिल्याने याचा फटकाही मविआला बसला आहे. 

याचबरोबर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेते, उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना बळ दिले होते. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी छोट्या छोट्या भागात जाऊनही सभा घेतल्या. लाडकी बहीण योजना, विविध प्रकल्प आदींचा जोरदार प्रचार केला. सोशल मीडिया, युट्यूबर्स, मुलाखती, जाहिराती आदींतून महायुतीने जोरदार ताकद लावली होती. 

Web Title: maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: Mavia's Panipat...! These ten strong reasons for Mahayuti's demise; Uddhav Thackeray, Sharad Pawar's sympathy faded...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.