NCP Sharad Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सध्या तरी पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. अजून मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी असून पवारांच्या उमेदवारांना विजयी होण्यासाठी आता अन्य फेऱ्यांमध्ये चांगली आघाडी घ्यावी लागणार आहे.
कोणत्या मतदारसंघात काय आहे स्थिती?
बारामती तिसरी फेरी - अजित पवार : 9206युगेंद्र पवार : 5007तिसरी फेरी आघाडी टोटल : 4199
तिसऱ्या फेरीअखेर अजित पवार 11174 मतांनी आघाडीवर
शिरूर माऊली कटके 8281 अशोक पवार 6303
इंदापूर विधानसभा मतदारसंघ पहिल्या फेरी अखेरपहिल्या फेरीतील मते दत्तात्रय भरणे 4866हर्षवर्धन पाटील 4530प्रवीण माने 1250दत्तात्रय भरणे 336 मतांनी आघाडीवर
कर्जत जामखेड राम शिंदे आघाडीवर, रोहित पवारांना धक्का राम शिंदे 541 मतांनी आघाडीवर.
आंबेगाव विधानसभा/पुणे
पाचवी फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील १५०८ मतांनी आघाडीवर, देवदत्त निकम पिछाडीवर