Maharashtra Assembly Election 2024 Results : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान केले आहे. राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार स्थानप होत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील बहुतांश एक्झिट पोल महायुतीच्याच बाजूने होते. मात्र महायुतीचा एवढा मोठा विजय होईल, असा अंदाज कुणीही वर्तवला नव्हता. महाराष्ट्रातील महायुतीच्या या विजयाचे श्रेय निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केलेल्या एका घोषनेला दिले जात आहे.
खरे तर, महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीच्या शिंदे सरकारने निवडणुकीपूर्वी 'लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली होती. ही योजना गेम चेंजर ठरली. निवडणुकीत या योजनेचा महायुतीला प्रचंड फायदा झाला आणि महायुतीने विक्रम विजय मिळवला. यापूर्वी मध्य प्रदेशातही 2023 च्या निवडणुकीपूर्वी शिवराज सरकारने 'लाडली बहन' योजना जाहीर केली होती.
एक्झिट पोल पेक्षाही मोठं यश - मराराष्ट्र विधानसभेसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर आणि निकालापूर्वी आलेले जवळपास सर्वच एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने होते. मात्र महायुतीला एवढा मोठा विजय मिळेल, या बाजूने ते नव्हते. मात्र प्रत्यक्ष निकालात महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय जनता पार्टी सलग तिसऱ्यांदा राज्यातील सर्वात मोठी पार्टी अथवा पक्ष ठरला आहे.
बघा लाइव्ह ब्लॉग : Watch Live Blog >>
मुख्यमंत्री कोण होणार? -तत्पूर्वी, पत्रकारांसोबत बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांच्या मनातील मुख्यमत्रीपदाच्या प्रश्नासंदर्भातही भाष्य केले, ते म्हणाले, "यासंदर्भात (मुख्यमंत्री पदासंदर्भात) अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, मुख्यमत्रीपद हे कुठल्याही निकशावर नाही, तर मुख्यमंत्रीपद हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील. एकनाथराव शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजित दादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना आमचे पार्लमेटरी बोर्ड नियुक्त करते. ते बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. कुठलाही वाद नाहीये, कुठलाही विवाद नाहीये."