Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:00 PM2024-11-23T22:00:41+5:302024-11-23T22:02:13+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम आपली स्थिती बळकट करण्यासठी मराराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उतरला होता. त्यांची नजर मुस्लीम आणि दलित मतदानावर होती. मात्र, त्यांच्या पक्षाची कामगिरी वाटली होती तशी झाली नाही...
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. ना ओवेसी बंधूंचे '15 मिनिट'चे राजकारण चालले, ना स्वतःला मुस्लिमांचा नेता म्हणवून घेण्याची खेळी कामी आली. याउलट, ओवेसी बंधूंनी ज्या घोषणेच्या सहाय्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीत हिंदू आणि मुस्लीम यांच्यात ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्याला महाराष्ट्रातील जनतेकडून चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.
असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम आपली स्थिती बळकट करण्यासठी मराराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उतरला होता. त्यांची नजर मुस्लीम आणि दलित मतदानावर होती. मात्र, त्यांच्या पक्षाची कामगिरी वाटली होती तशी झाली नाही.
एआयएमायएमची कामगी -
ओवेसी यांच्या AIMIM ने एकूण 16 उमेदवार महाराष्ट्र विधानसभेच्या मैदानात उतरवले होते. यांपैकी, 15 ओवेसी यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. 4 जागांवर AIMIM दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर मालेगांव मध्यमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. येथे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा विजय झाला. ते केवळ 162 मतांनी विजयी झाले आहे. त्यांना 109653 मते मिळाली आहेत.
अर्थात, असदुद्दीन ओवेसींची जादू महाराष्ट्रात चालली नाही आणि त्यांची रणनीतीही फेल झाली. ज्यात त्यांनी '15 मिनिट' हे वादग्रस्तत वक्तव्य निवडणूक मुद्दा म्हणून वापरले होते.