शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:13 PM2024-11-23T19:13:17+5:302024-11-23T19:16:48+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालाच्या आदल्यादिवशीच राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी नवीन मुख्यमंत्री रााजभवनाच्या बाहेर, वेगळ्या ठिकाणी शपथविधी घेऊ शकतात, असे म्हटले होते.

maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Place of swearing-in ceremony decided? It won't happen at Raj Bhavan, the at Wankhede again after 2014 | शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

महाराष्ट्र विधानसभेला महायुतीने मविआचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. निकालाच्या आदल्यादिवशीच राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी नवीन मुख्यमंत्री राजभवनाच्या बाहेर, वेगळ्या ठिकाणी शपथविधी घेऊ शकतात, असे म्हटले होते. आज याबाबतची माहिती येत आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. 

महायुतीचे नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु झाली आहे. अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव ठरलेले नसले तरी वानखेडेवर शपथविधी घेण्याची तयारी सुरु झाली आहे. 

2014 मध्ये आघाडीकडून सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडिअममध्ये शपथ सोहळा आयोजित केला होता. यावेळी भाजपाचे सुमारे ३५००० कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते. असाच भव्यदिव्य सोहळा पुन्हा आयोजित करण्याच्या तयारीला भाजपा लागली आहे.

महायुतीला २३६ जागा मिळत आहेत. तर मविआला ४९ व अपक्ष व इतरांना ४ जागा मिळत आहेत. यापैकी एका अपक्षाला मुंबईत आणण्यासाठी भाजपाकडून हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे. 

Web Title: maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Place of swearing-in ceremony decided? It won't happen at Raj Bhavan, the at Wankhede again after 2014

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.