Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:36 AM2024-11-23T08:36:36+5:302024-11-23T08:37:34+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: पक्षातील आमदार पुन्हा फुटू नयेत, यासाठी खबरदारी घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Sharad Pawar Uddhav Thackerays cautious step even before the result An important decision to avoid split | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!

Vidhan Sabha Election Result ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्यात कोणाची सत्ता येणार, हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. मागील पाच वर्ष महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये बंड होऊन उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरेशरद पवार यांना नवीन पक्ष आणि चिन्हासह निवडणुकीला सामोरे जावे लागले. पक्षातील आमदार पुन्हा फुटू नयेत, यासाठी खबरदारी घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांकडून आम्ही पक्षासोबतच राहू, अशी प्रतिज्ञापत्रे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंसोबत जाणं पसंत केलं होतं. तर राष्ट्रवादीतील बंडानंतरही ४० हून अधिक आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली होती. यंदाच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी मागील दोन दिवसांत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्रे घेतल्याचे समजते.

"थेट मुंबईला या"

निवडून आल्यानंतर साधारणतः उमेदवाराची विजयी मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत बराच वेळ जातो. यावेळी मात्र निवडून आल्यानंतर मिरवणूक न काढता थेट मुंबईला येण्याच्या सूचना सर्व उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. आपल्या आजूबाजूच्या मतदारसंघात अपक्ष निवडून येत असेल, तर त्यांच्याशी संपर्क करून त्याला मविआच्या बाजूने वळवण्यासाठी त्याची भेट घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्याचे मविआतील एका नेत्याने 'लोकमत'ला सांगितले.

"शेवटचे मत मोजून पूर्ण होईपर्यंत केंद्र सोडू नका"

लोकसभा निवडणुकीत काही मतमोजणी केंद्रांवर झालेला गोंधळ लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत अधिक सतर्क राहण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी पावले उचलली आहेत. मतमोजणी केंद्रावर शेवटचे मत मोजून पूर्ण होईपर्यंत केंद्र सोडू नका, अशा स्पष्ट सूचना मविआतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रत्येक मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीने काय काळजी घ्यायची, याच्या सूचना काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम असेल, अशाच पदाधिकाऱ्याची उमेदवाराचा पोलिंग एजंट म्हणून नियुक्ती करण्याची खबरदारी मविआने घेतली आहे. ईव्हीएमवरील मतदान सुरू झालेली व संपलेली वेळ, तारीख, एकूण मतदार, झालेले मतदान, मशीनचा नोंदणी क्रमांक याची पडताळणी १७ सी फॉर्मनुसार तपासून पाहावी, मतमोजणी पूर्ण झाल्यावर फॉर्म १७ सी १ आणि सी २ वरील मतदानाचे आकडे पडताळून घ्या. टपाली मतदानाच्या मोजणीवर बारीक लक्ष ठेवा. कंट्रोल युनिटचे पिंक पेपर सील, ग्रीन सील तपासावे, मतमोजणी फेरी पूर्ण झाल्यानंतर आकडेवारी जुळून जाहीर झाल्याशिवाय पुढील फेरीची मतमोजणी सुरू होई देऊ नका, अशा सूचना पोलिंग एजंटना दिल्या आहेत.

Read in English

Web Title: maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Sharad Pawar Uddhav Thackerays cautious step even before the result An important decision to avoid split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.