Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 11:09 PM2024-11-23T23:09:43+5:302024-11-23T23:10:35+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या होत्या. तसेच त्यांचे व्होट शेअरिंगदेखील 17 टक्क्यांच्या जवळपास होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अति प्रचंड बहुमत मिळाले आहेत. तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारणाचे चाणक्य म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सपाटून मार खावा लागला आहे. या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच समधान मानावे लागले आहे.
गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या होत्या. तसेच त्यांचे व्होट शेअरिंगदेखील 17 टक्क्यांच्या जवळपास होते.
शरद पवार गटातील हे नेते झाले विजयी -
1. मुंब्रा विधानसभा : या जागेवर जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. त्यांनी 96 हजारहून अधिक मतांनी अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांचा पराभव केला.
2. वडगांव शेरी विधानसभा: येथे बापूसाहेब तुकाराम पठारे यांचा विजय झाला आहे. त्यांनी 4710 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला.
3. करजत जमखेड : येथे रोहित पवार यांचा विजय झाला आहे. त्यांनी. त्यांनी भाजपचे प्रध्यापक राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव केला.
4. बीड : संदीप रविंद्र क्षीरसागर यांचा विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागर यांचा 5324 मतांनी पराभव केला.
5. करमाळा : येथे नारायण गोविंदराव पाटील यांचा विजय जाला. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या दिग्विजय बागल यांचा पराभव केला. बागल येथे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
6. माढा : अभिजीत पाटील यांचा विजय झाला. त्यांनी अजित पवार गटाच्या मीनलताई साठे यांचा पराभव केला. साठे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या दोघांमध्ये विजयाचे अंतर 1 लाख 20 हजार एवढे होते.
7. मोहोल : येथे खरे राजू ज्ञानू यांचा विजय झाला. त्यांनी अजित पवार गटाचे माणे यशवंत विठ्ठल यांचा 30 हजार हून अधिक मतांनी पराभव केला.
8. माळशिरस - शरद पवार गटाचे उत्तमराव शिवदास जानकार यांनी विजय मिळवला. त्यांनी 13 हजारहून अधिक मतांनी भाजपचे राम विठ्ठल यांचा पराभव केला.
9. इस्लामपूर - येथून जयंत राजाराम पाटील यांचा विजय झाला. त्यांनी एनसीपी अजित पवार गटाचे नेते निशिकांत प्रकाश भोसले पाटील यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला.
10. तासगांव : येथून रोहित पाटील यांचा विजय झाला. त्यांनी संजयकाका पाटील यांचा 27 हजार हून अधिक मतांनी पराभव केला.