Maharashtra Vidhan Sabha Election: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भाजपानं महाविकास आघाडीला धक्का देत आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार पराभूत झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसचे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप दुसऱ्या फेरी अखेर निवडून आले आहेत.
भाजपाच्या पाचव्या उमेदवाराकडे म्हणजे प्रसाद लाड यांच्याकडे मतं नव्हती. तरीही प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा अधिक मतं मिळवली आहेत. भाजपाला यावेळी राज्यसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतं विधान परिषद निवडणुकीत मिळाल्याचं दिसून आलं आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपाला पहिल्या पसंतीची १२३ मतं मिळाली होती. यावेळी भाजपाला तब्बल १३३ पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची मतं फुटल्याची चर्चा सुरू आहे. यातच काँग्रेसचे ४४ आमदार असतानाही पहिल्या पसंतीची ४१ मतं काँग्रेस उमेदवाराला मिळाली. त्यामुळे काँग्रेसची ३ मतं फुटल्याचं उघड झालं आहे. तर शिवसेनेच्या ५४ मतांपैकी ५१ पहिल्या पसंतीची मतं शिवसेनेला मिळाली आहेत. म्हणजेच शिवसेनेचीही तीन मतं फुटली आहेत.
दुसऱ्या फेरीत प्रसाद लाड यांनी मारली बाजीपहिल्या फेरीत भाजपाचे चार उमेदवार निवडून आले होते. तर दुसऱ्या फेरीत प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस होती. यात प्रसाद लाड यांनी बाजी मारत निवडून येण्यासाठीचा २६ मतांचा कोटा पूर्ण केला. तर भाई जगताप यांनाही २६ मतं मिळाली आहे. पण चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं पडली आहेत.
कुणाला किती मतदान?प्रवीण दरेकर (भाजपा)- २९ श्रीकांत भारतीय (भाजपा)- ३०राम शिंदे (भाजपा)- ३०उमा खापरे (भाजपा)- २७प्रसाद लाड (भाजपा)- २८एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)- २९रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)- २८आमश्या पाडवी (शिवसेना)- २६सचिन अहिर (शिवसेना)- २६भाई जगताप (काँग्रेस)- २६चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)- २२ (पराभूत)