शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
3
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
4
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
5
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
6
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
7
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
8
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
9
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
10
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
12
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
13
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
14
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
15
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
18
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
19
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
20
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार

Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:32 AM

Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : सुरुवात पोस्टल मतमोजणीपासून झाली. त्यानंतर प्राथमिक कल हाती येऊ लागले. यामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. सुरुवात पोस्टल मतमोजणीपासून झाली. त्यानंतर प्राथमिक कल हाती येऊ लागले. यामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. 

(Maharashtra Election Results 2024)

विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम हे तीन नेते पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार सध्या राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. ब्रह्मपुरी मतदारसंघामधून काँग्रेसचे विजय वड्डेटीवार विरुद्ध भाजपचे कृष्णलाल सहारे अशी लढत होती. या मतदारसंघातून विजय वड्डेटीवर पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलात पाहायला मिळाले. 

संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांच्यात लढत होती. या मतदारसंघातून बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे सांगलीत फायरब्रँड नेते विश्वजीत कदम पिछाडीवर आहेत. पलूस कडेगाव मतदार संघातून विश्वजीत कदम यांच्याविरोधातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आघाडीवर असल्याचे चित्र आहे. हे सुरुवातीचे काही कल आहेत.

दरम्यान, सुरुवातीच्या कलात विधानसभेच्या २८८ जागांपैकी पैकी १६३ जागांवर महायुती पुढे आहे. तर ११० जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजप १०२ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाचे ३८ उमेदवार पुढे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट २७ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस ३२ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट २४ जागांवर आघाडीवर आहे. ३८ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीवर आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातVishwajeet Kadamविश्वजीत कदमVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र