Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:17 PM2024-11-23T14:17:01+5:302024-11-23T14:19:35+5:30
Chitra Wagh : आतापर्यंतचे कल पाहता महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. यात भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमताकडे मुसंडी मारली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. आतापर्यंतचे कल पाहता महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. यात भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरला आहे.
भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, भाजपला भरभरुन मतं दिल्यामुळे लाडक्या बहिणींचे देखील चित्रा वाघ यांनी आभार मानले आहेत. त्यांनी एक्सवर (ट्विटर) देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे.
महायुतीच्या विजयाचे शिल्पकार
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 23, 2024
one and only one …..
राज्यातील लाडक्या बहीणींचा लाडका भाऊ…..देवाभाऊ देवाभाऊ 👍👍👍@Dev_Fadnavis@cbawankule@byadavbjp@ShelarAshishpic.twitter.com/NxgMjLvTVG
या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस पेढा खाताना दिसत आहे. तसेच, फोटो पोस्ट करत चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'महायुतीच्या विजयाचे शिल्पकार' असा केला आहे. याशिवाय, "one and only one…, राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ... देवाभाऊ देवाभाऊ" असे देखील चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जय हो ऽऽऽऽऽ विजय हो ऽऽऽऽऽ@Dev_Fadnavispic.twitter.com/hEBIoCx2RX
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 23, 2024
शिवछत्रपतींचा आशीर्वाद…
चित्रा वाघ यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी "शिवछत्रपतींचा आशीर्वाद… मोदीजींच्या सदिच्छा…देवेंद्रजींच्या पाठीशी… महाराष्ट्राच्या शुभेच्छा….!!" अशी एक पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे. याचबरोबर, चित्रा वाघ यांनी लाडक्या बहिणींचे देखील आभार मानले आहेत. "देवेंद्र जी ….देवेंद्रजी आणि देवेंद्र जी… चप्पा चप्पा भाजपा…. माझ्या राज्यातील सगळ्या लाडक्या बहीणीचें आभार…आभार ..आभार", अशीही पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.
जीत गये भाई जीत गये…..
चप्पा चप्पा भाजपा…. 🪷 🪷 🪷 🪷
जय भाजपा…..विजय भाजपा👍👍👍👍@Dev_Fadnavis@cbawankule@byadavbjp@ShelarAshishpic.twitter.com/l8N5JBVzbt— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 23, 2024