सोलापूर : सोलापूर परिसरामध्ये काल रात्रापासून रिमझिम पाऊस सुरू असून याचा मोठा परिणाम मतदानावर झालेला दिसत आहे. मतदान केंद्रावर शुकशुकाट असून विनायक नगर परिसरातील मतदान केंद्रामध्ये गुडगाभर पाणी साचले आहे.
सुरुवातीच्या काळात थोड्या संथगतीने मतदान प्रक्रिया सुरू होत असल्याचे चित्र आहे. अनेक मतदान केंद्रावर बुथ एजंटचा पोहोचले नाहीत. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही मिनिटे उशिरा सुरू झाली आहे. अशातच काही भागात पाणी साचण्यास सुरूवात झाल्याने मतदारांनीही सकाळच्या सत्रात मतदानाकडे पाठ फिरविली आहे.
अशीच काहीशी परिस्थिती लातूरमध्ये असून रात्रभर झालेल्या पावसाने अद्यापी विराम घेतलेला नाही. त्यामुळे मतदानाला पहिल्या टप्प्यात गती नाही. आभाळ भरून आलेले आहे, दिवसभर पावसाची चिन्हे आहेत. परिणामी मतदानाचा टक्का घसरण्याची भीती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रिक्षा व अन्य वाहनांची यंत्रणा वाढवली आहे. शहरातील मतदारांना बाहेर काढण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे.
भवानी पेठ मतदान केंद्रांमध्ये पावसाचं पाणी शिरलं.