मुंबई : सरकारी नोकरभरतीच्या पेपरफुटीचा तपास योग्य दिशेने सुरू असून, शेवटचा आरोपी सापडत नाही तोवर हा तपास सुरूच राहील, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना वळसे म्हणाले की, पेरपफुटी प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. राज्य पोलीस हा तपास करण्यास सक्षम आहेत. राज्यात पोलिसांची पाच हजार पदे भरण्यात आली असून, आणखी सात हजार पदे भरण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईतील त्या बारचा परवाना रद्दनवी मुंबईत डान्स बारच्या आड वेश्याव्यवसाय होत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता सहा बार मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच चार बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.