नितिन पंडीत
भिवंडी: गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सणांचे औचित्य साधून भिवंडी बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने भिवंडीतील पद्मानगर येथे पोषणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून पोषणाची मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते केले.
या कार्यक्रमांद्वारे बालकांच्या पोषणाचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले . शालेय विद्यार्थ्यांनी पोषणाचे महत्व पटवून देणारे व माहिती फलक मंगळागौर कार्यक्रमाप्रसंगी हातात घेत पोषणाची मंगळागौर साजरी केली. भिवंडी बाल विकास प्रकल्प कार्यालयाने आयोजित केलेल्या या अनोख्या जनजागृतीपर नागरिकांनी स्वागत व कौतुक केले . या कार्यक्रमादरम्यान बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय खंडागळे, मुख्यसेविका पर्यवेक्षिका तृप्ती भोये यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर बीट क्रमांक तीन पदमानगरच्या सेविका व मदतनिस यांनी विशेष मेहनत घेतली.