राजकुमार सारोळे
सोलापूर : दुष्काळाच्या झळांनी कोरड्या पडणाºया घशाची तहान भागविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, पण मुक्या जनावरांचे काय, असा आता प्रश्न समोर येत आहे. अक्कलकोट तालुक्यातील ब्यागेहळ्ळी या गावाला भेट दिल्यावर ग्रामस्थांनी जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न मांडला.
अक्कलकोटपासून ४ किलोमीटर अंतरावर वसलेले ब्यागेहळ्ळी गाव दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघत आहे. एकेकाळी गावतलावाच्या पाण्यामुळे परिसर हिरवागार असणाºया या गावात आज पाणी आणि चाºयाची तीव्र टंचाई भासत आहे. पाणीटंचाईबाबत प्रशासनाने मार्ग काढला तरी जनावरांची तहान भागविण्यासाठी शेतकºयांना रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तलावाकाठी विहीर खोदण्यात आली आहे. तलाव आटल्यानंतर विहीर कोरडी पडली. त्यामुळे जानेवारीपासून गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या महिन्यात ही स्थिती बिकट झाल्यावर तहसीलदार अंजली मरोड यांनी भेट देऊन टँकरची सोय केली. दररोज पाणीपुरवठा विहिरीत टँकरच्या तीन खेपा करून पाणीपुरवठा योजनेतून गावाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तरी लोकांना वापरण्यासाठी व जनावरांची तहान भागविण्यासाठी पाण्याचा शोध घेण्याची वेळ आल्याचे देवेन माने यांनी सांगितले. पावसाअभावी पिके न आल्याने चाºयाची सोय करावी, अशी मागणी लक्ष्मण कोळी यांनी केली.
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी ग्रामपंचायतीने बोअर मारला आहे, पण त्यातून पुरेसे पाणी येत नाही. त्यामुळे गावातील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव दिला. विहिरी ताब्यात घेतील या भीतीने गावातील शेतकरी साळुंके, स्वामी हे रात्रीच पाण्याचा उपसा करतात, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली. वापरासाठी पाणी शेतातून आणावे लागते, अशी व्यथा शिवाजी गायकवाड यांनी मांडली.
पाण्याची तपासणी नाहीच- टंचाईमुळे टँकरने पाणी आणून विहिरीत ओतले जाते. पाणी आणण्याची ठिकाणे बदलल्याने पाण्याची चवही बदलून गेल्याने आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. पिण्याच्या पाण्याची आरोग्य खात्यामार्फत तपासणी होत नाही. टँकर आणला की विहिरीत ओतला जातो, असे गोरखनाथ गायकवाड यांनी सांगितले. हीच परिस्थिती कर्जाळ, लिंबीचिंचोळी येथील टँकरची असल्याचे दिसून आले.
नागरिक म्हणतात...पाण्याची चव बदललीपाणी टंचाईमुळे गळोरगी येथील तलावातून टँकरने पाणी आणले जात होते. पण तेथे पाणी कमी पडू लागल्याने आता आहेरवाडी येथील एनटीपीसी परिसरातून पाणी आणले जात आहे. त्यामुळे पाण्याची चव बदलली आहे. बोअरचे पाणी पिण्यायोग्य नाही, अशी माहिती सागर न्हावी यांनी दिली.
पाणीपातळी खालावलीएकेकाळी ब्यागेहळ्ळी गाव पाणीदार होते. पण यंदा अत्यंत कमी पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. ८00 फूट बोअर मारले तरी इंचभर पाणी मिळत नाही. शेतीचे पीक हातचे गेले आहे. त्यामुळे जनावरांना चाºयाची सोय करण्यात यावी, अशी मागणी गोपाळ माशाळे यांनी केली.
पाऊस हाच पर्याययंदा पावसाअभावी गावातील दोनही तलाव आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या झळा आम्ही सोसत आहोत. आता पाऊस पडल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. मिरग बरसण्याची प्रतीक्षा आहे, असे लक्ष्मण माशाळे म्हणाले.