मोहटा देवस्थानला माहिती अधिकार लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:51 AM2017-07-31T02:51:23+5:302017-07-31T02:54:09+5:30
मोहटा देवस्थान ट्रस्ट शासकीय अनुदान घेत असल्याने या देवस्थानला माहिती अधिकार लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा जिल्हा न्यायालयातील अपिलीय अधिकारी तथा जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी दिला आहे.
अहमदनगर : मोहटा देवस्थान ट्रस्ट शासकीय अनुदान घेत असल्याने या देवस्थानला माहिती अधिकार लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा जिल्हा न्यायालयातील अपिलीय अधिकारी तथा जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी दिला आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अध्यक्ष म्हणून या देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली, ही माहिती मागणारा अर्ज देवस्थानकडे वर्ग करण्याचा आदेशही माहिती अधिकाºयाला देण्यात आला आहे.
जिल्हा न्यायाधीश हे जगदंबा देवी ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष असतात. अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीशांनी सन २०१५, २०१६ व २०१७ या कार्यकाळात देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली. तसेच गत ११ जानेवारीला देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीला विद्यमान अध्यक्ष सुवर्णा केवले या उपस्थित होत्या का? याबाबतची माहिती जिल्हा न्यायालयाकडे माहिती अधिकारात मागण्यात आली होती.
सदर माहिती ही अर्जदार मोहटा देवस्थान यांचे कार्यालयाकडून प्राप्त करुन घेऊ शकतात. तसेच सदर माहिती ही अभिलेखातील असल्यामुळे न्यायालयात प्रमाणित प्रती घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार अर्ज करुन माहिती घेऊ शकता, असे उत्तर प्रभारी माहिती अधिकारी शि. ग. कोल्हे यांनी दिले होते.