..तर कदाचित मुंडे बचावले असते-हर्षवर्धन
By admin | Published: June 5, 2014 12:20 AM2014-06-05T00:20:22+5:302014-06-05T00:20:22+5:30
ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित ते आज आपल्यात असते, अशी भावना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़ हर्षवर्धन यांनी बुधवारी बोलून दाखवली़
Next
>नवी दिल्ली : ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित ते आज आपल्यात असते, अशी भावना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़ हर्षवर्धन यांनी बुधवारी बोलून दाखवली़ एवढेच नव्हे तर गाडी चालवताना सुरक्षा उपाय म्हणून सीट बेल्ट बांधण्यासंदर्भात व्यापक जनजागृती मोहीम उघडण्याचेही त्यांनी जाहीर केल़े
मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्राच्या बीड येथे रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होत़े सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित मुंडे बचावले असत़े एका गैरसमजामुळे मी आपला एक चांगला मित्र गमावला़ गाडीत मागच्या सीटवर बसणा:यास सीट बेल्ट लावण्याची गरज नसते, असा गैरसमज आपण बाळगतो़ सीट बेल्ट केवळ समोर बसलेल्या व्यक्तींसाठी असतो, असे आपण मानतो़ पण हे चुकीचे आह़े समोर बसलेल्या व्यक्तीप्रमाणोच गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनीही सीट बेल्ट बांधणो गरजेचे आह़े आपले मंत्रलय सीट बेल्टसंदर्भात जनजागृती मोहीम चालवेल, असेही त्यांनी सांगितल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)